By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2019 06:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत पी.व्ही. सिंधूने सुवर्णपदक पटकावल्यानंतर पाठोपाठ वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेत 3 वेळच्या एसएल 3 प्रकारात विजेत्या ठरलल्या पारुल परमारचा अपघातात डावा पाय गमावलेल्या मानसी जोशीने 21-12, 21-7 असा पराभव करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तिचे हे पॅरा बॅडमिंटन स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक आहे.
2011 मध्ये मानसीला एका ट्रकने उडवले होते. त्यात तिला तिचा डावा पाय गमवावा लागला होता. 10 तासांच्या शस्त्रक्रियेनंतरही काही उपयोग झाला नाही. त्यानंतरही तिने खचून न जाता 2012 ला कृत्रिम पायाच्या सहाय्याने चालण्यास सुरवात केली. त्यानंतर तिने इंटर कंपनी बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात तिने सुवर्ण पदक जिंकले. 2015 पासून ती पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत खेळात आहे. दिवसातून 3 वेळा ती सराव करते . तिचे सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
विंडीजच्या खेळपट्टी वर 3 सामन्याच्या मालिकेत प्रचंड फरकाने विजय मिळविल्या....
अधिक वाचा