By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 02:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सचिनचा वाढदिवस म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी, त्याच्या चाहत्यांसाठी मोठा सोहळाच म्हणता येईल. या निमित्ताने सचिनचा प्रत्येक फॅन हा आपापल्या परीने आपल्या लाडक्या ‘गॉड ऑफ क्रिकेट’ला शुभेच्छा द्यायला उत्सुक आहे. अभिषेक साटम नावाच्या एका चाहत्याने सचिनला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनची प्रतिमा असणारे 46 X 24 फुट उंचीचे मोझिएक आर्ट अभिषेकने बनवले आहे. नेरूळ येथील सीवुड्स ग्रँड सेंट्रल येथे ही कलाकृती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. या कलाकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करत ही कलाकृती बनवण्यात आली आहे.
10 हजार बटन, 4 हजार मीटरचे चेन झिपर्स, 1 हजार दोर्यांचे रिळ, 50 कात्री, 500 हँगर, 10 हजार सेफ्टी पिन, 400 लोकरीचे धागे, 50 पेक्षा जास्त माप मोजण्याची टेप, 100 मीटर सॅटिनचे कापड आणि शिवण यंत्राचे काही सुटे भाग वापरून ही भव्य कलाकृति बनवण्यात आली आहे. ही कलाकृती बनवण्यात उमंग मेहता, कांबळी आर्टसचे सईश कांबळी, चेतन राऊत, रंग रेषा टीम यांचाही सहभाग आहे. सोशल मीडियावरही सचिनचे चाहते वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. कोणी गाण्याचे व्हिडीओ बनवून तर कोणी सचिनच्या फोटोंचा कोलाज बनवून सचिनचा वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसत आहे.
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून आजच्या घडीला महेंद्रसिंग धोनी....
अधिक वाचा