By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 11:23 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
मेलबर्न - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या दशकातील सर्वोत्तम वन डे टीमचा कॅप्टन म्हणून धोनीची निवड करण्यात आली आहे. तर विराट कोहली हा दशकातील सर्वोत्तम कसोटी संघाचा कर्णधार ठरला आहे.
‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने मंगळवारी दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय आणि कसोटी टीमची घोषणा केली. वन डे टीममध्ये तिघा भारतीय क्रिकेटपटूंना स्थान देण्यात आलं आहे. धोनीसोबतच ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. मिशेल स्टार्क हा एकमेव ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू या यादीत आहे.
Only one Aussie makes our ODI Team of the Decade...https://t.co/nYpzA4pmBk
— cricket.com.au (@cricketcomau) December 24, 2019
‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या वनडे टीममध्ये धोनीकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलासोबत रोहित शर्मा सलामीवीर आहे. तर कोहली नेहमीप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आहे. ज्येष्ठ पत्रकार मार्टिन स्मिथ यांनी ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या दशकातील सर्वोत्तम टीम्सची निवड केलेली आहे. धोनी हा भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सुवर्णकाळाचा महत्त्वाचा मोहरा आहे, असं स्मिथ म्हणतात.
2011 मध्ये आपल्या देशाला घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकून देण्यासाठी त्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने मोलाची कामगिरी बजावली. धोनी हा भारताचा सर्वोत्तम ‘फिनिशर’ ठरला, असंही मार्टिन स्मिथ लिहितात. मार्टिन स्मिथ यांनी विराट कोहलीलाही दशकातील “सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज” म्हणून संबोधलं आहे.
‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ची दशकातील सर्वोत्तम कसोटी टीम
एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक) (भारत), रोहित शर्मा (भारत), हाशिम आमला (द. आफ्रिका), विराट कोहली (भारत), एबी डिव्हिलियर्स (द. आफ्रिका), साकिब अल हसन (बांगलादेश), जॉस बटलर (इंग्लंड), राशिद खान (अफगाणिस्तान), मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), ट्रेंट बाउल्ट (न्यूझीलंड), लसिथ मलिंगा (श्रीलंका)
विराट कोहली हा दशकातील सर्वोत्तम कसोटी संघाचा कर्णधार ठरला आहे. कोहली हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम कसोटी संघात स्थान मिळवणारा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. विशेष म्हणजे कोहलीची दोन्ही संघात वर्णी लागली आहे.
‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ची दशकातील सर्वोत्तम कसोटी टीम
विराट कोहली (कर्णधार), अॅलिस्टर कुक, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ, एबी डीव्हिलियर्स (यष्टिरक्षक), बेन, स्टोक्स, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, नॅथन लियॉन, जेम्स अँडरसन.
अवघ्या चार दिवसांवर नाताळ सण येऊन ठेपला आहे. प्रत्येक लहान म....
अधिक वाचा