ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एमएस धोनीने अखेर निवृत्तीच्या प्रश्नावर मौन सोडलं

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2019 11:43 AM 2019-02-12T14:15:30+5:30

एमएस धोनीने अखेर निवृत्तीच्या प्रश्नावर मौन सोडलं

शहर : मुंबई

एमएस धोनीने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांवर अखेर भाष्यं केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याबाबत जानेवारी महिन्यापर्यंत बोलणार नाही, असं धोनीने सांगितलं आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमात धोनीला हा प्रश्न विचारण्यात आला होता. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये धोनी शेवटचा खेळला होता. त्यानंतर धोनी टीमबाहेर आहे. भारताचा वेस्ट इंडिज दौरा, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या सीरिजमधून धोनीने माघार घेतली. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-२० सीरिजमध्येही धोनी खेळणार नाही.

ऋषभ पंत हा वनडे आणि टी-२०मध्ये अपयशी ठरत असल्यामुळे धोनीची कमी जाणवत आहे. निवृत्तीबाबत धोनीने कायमच मौन बाळगणं पसंत केलं आहे. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही अनेकवेळा धोनीचा बचाव केला आहे. धोनी कधीपासून खेळायला सुरुवात करतो आणि आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो?, तसंच दुसऱ्या विकेट कीपरची कामगिरी आणि धोनीचा फॉर्म यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, असं प्रशिक्षक रवी शास्त्री मंगळवारी म्हणाले होते.

आयपीएलनंतर टी-२० वर्ल्ड कपसाठीची भारतीय टीम जवळपास निश्चित होईल. आयपीएलपर्यंत आपल्याला थांबाव लागेल, त्यानंतरच सर्वोत्तम १७ खेळाडू कोण आहेत, याचा निर्णय घेता येईल, अशी प्रतिक्रिया रवी शास्त्रींनी दिली होती.

 

मागे

टी-२० मालिकेसाठी शिखर धावनला डच्चू
टी-२० मालिकेसाठी शिखर धावनला डच्चू

येत्या ६ डिसेंबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणार्‍या टी-२० मालिकेसाठी....

अधिक वाचा

पुढे  

श्रीलंकेच्या गोलंदाज मुथय्या मुरलीधरनची राज्यपालपदी नियुक्ती
श्रीलंकेच्या गोलंदाज मुथय्या मुरलीधरनची राज्यपालपदी नियुक्ती

कोलंबो, श्रीलंकेचा विख्यात गोलंदाज मुथय्या मुरलीधरण यांची श्रीलंकेच्या उ....

Read more