ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बीसीसीआयच्या करारातून महेंद्रसिंग धोनी बाहेर 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 16, 2020 05:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बीसीसीआयच्या करारातून महेंद्रसिंग धोनी बाहेर 

शहर : मुंबई

        मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०१९ -२० या वर्षासाठी क्रिकेटपटूसोबतचे करार जाहीर केले आहे. गेल्या वर्षी महेंद्रसिंग धोनीला ‘ए ग्रेड’ मध्ये स्थान देण्यात आले होते. परंतु यावर्षी या करारात त्याला कोठेही स्थान देण्यात आलेले नाही. यावर्षी ग्रेड ‘ए प्लस’ मध्ये सर्वाधिक मानधन मिळवणा-या क्रिकेटपटूंमध्ये कर्णधार विराट कोहली, हिटमॅन रोहित शर्मा तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बूमराह यांचा समावेश आहे. 


        ‘ए ग्रेड’ मध्ये आर.अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्मय रहाणे, के. एल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत यांचा समावेश करण्यात आला आहे. ‘ग्रेड बी’ मध्ये वृद्धीमान सहा, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, मयांक अग्रवाल हे खेळाडू आहेत. तर  ‘ग्रेड सी’ मध्ये केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पंड्या, हनुमान विहारी, शादुर ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे.


      दरम्यान, ‘ए प्लस’ मध्ये असलेल्या क्रिकेटपटूंना 7 कोटी, ‘ए’ ग्रेडमधील खेळाडूंना 5 कोटी, ‘बी’ ग्रेडमधील खेळाडूंना 3 कोटी तर ‘ग्रेड सी’ मधील खेळाडूंना 1 कोटी मानधन दिले जाईल.
 

मागे

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार नाही 
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार नाही 

   नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वातावरण तापलेले असताना पा....

अधिक वाचा

पुढे  

रविवारपासून आयसीसीची १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धा सुरू
रविवारपासून आयसीसीची १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धा सुरू

      केपटाऊन - भारताच्या १९ वर्षाखालील संघाने आयसीसी स्पर्धेचे २०००, २....

Read more