By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 11, 2019 01:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
चार फलंदाज लवकर बाद झाल्याने हा सामना मुंबई हरणार असे वाटत असतानाच लवकर फलंदाजी करण्यास आलेल्या कर्णधार पोलार्डने जोरदार फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याला साथ देण्यासाठी हार्दिक पांड्याही आला. या दोघांनी मुंबईला 15 व्या षटकात 135 धावांपर्यंत पोहचवले. पण, शामीने पुन्हा पंजाबला तारले. त्याने हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या या दोन घातक पांड्यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पांड्या बंधू बाद झाल्यानंतर पोलार्डला एकाकी झुंज द्यावी लागली.
पोलार्डने लिडिंग फ्रॉम द फ्रंट याचे उदाहरण घालून देत कर्णधाराला साजेशी खेळी केली. त्याने 22 चेंडूत अर्धशतक ठोकत मुंबईने अजून सामना सोडलेला नाही हे दाखवून दिले. त्याने 50 धावांमध्ये तब्बल 7 षटकार मारले. पोलार्डने 12 चेंडूत 32 धावांची गरज असताना 19 व्या षटकात 17 धावा करत सामन्याचे पारडे मुंबईकडे झुकवले. अखेरच्या षटकात 15 धावांची गरज असताना राजपूतच्या पहिल्याच चेंडूवर षटकार आणि बोनस म्हणून फ्री हिट मिळाली. फ्री हिटवर चौकार ठोकत बॉल टू रन मॅच आणली. 5 चेंडूत 4 धावांची गरज असताना राजपूतने पोलार्डला 31 चेंडूत 83 धावा बाद केले. पुढचाच बॉल डॉट टाकत राजपूतने जोसेफवर दबाव आणला. पुढच्या चेंडूवर सिंगल घेत जोसेफने नॉन स्ट्राईकला जाणे पसंत केले. 2 चेंडूत 3 धावांची गरज असताना राहुल चहरने 1 धाव केल्याने अखेरच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज होती. त्यावेळी जोसेफने दोन धावा करत विजय खेचून आणला.
पंजाबने मुंबई इंडियन्सची धुलाई केली आहे. रोहितच्या गैरहाजरीत कर्णधार झाले....
अधिक वाचा