ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारताची अपूर्वी चंडेला ठरली जगात नंबर वन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 01, 2019 06:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारताची अपूर्वी चंडेला ठरली जगात नंबर वन

शहर : देश

भारताची महिला नेमबाज अपूर्वी चंडेला जगात नंबर वन ठरली आहे. महिलांच्या १० मी. एअर रायफल स्पर्धेच्या क्रमवारीत अपूर्वीने अव्वल स्थान पटकावले आहे. या क्रमवारीच्या दुसऱ्या स्थानावरही भारताच्याच अंजुम मोदगिल आहे.जगात अव्वल ठरल्यावर अपूर्वी म्हणाली की, " आतापर्यंत केलेल्या कामगिरीचे हे फळ आहे. ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. कारण यामुळे माझ्या कारकिर्दीला अधिक बळकटी येऊ शकते."

अपूर्वीने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या वर्ल्डकपमध्ये २५२. गुणांसह सुवर्णपदक पटकावले होते. त्यावेळी अपूर्वीने विश्व विक्रमालाही गवसणी घातली होती. त्याचबरोबर अपूर्वीने २०१४ साली ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर २०१८ साली गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. गेल्यावर्षी झालेल्या आशियाई स्पर्धेतील १० मी. मिश्र रायफल गटामध्ये अपूर्वीने कांस्यपदक पटकावले होते.

मागे

एक-दोन सामने खेळवून डावलल्यावर सातत्य कसे राखणार? उमेश यादव निवड समितीवर बरसला
एक-दोन सामने खेळवून डावलल्यावर सातत्य कसे राखणार? उमेश यादव निवड समितीवर बरसला

आयपीएल 2019 : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात जलद माऱ्याच....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2019 : दिल्लीविरुद्ध धोनी खेळणार नाही?
IPL 2019 : दिल्लीविरुद्ध धोनी खेळणार नाही?

आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल....

Read more