By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 08, 2020 05:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
ऑकलंड : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा २२ धावांनी पराभव झाला आहे. न्यूझीलंड संघाने दिलेल्या २७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची चांगलीच दमछाक झाली. ऑकलंड वनडेमध्ये ४८.३ षटकांत सर्व विकेट्स गमावून भारताला फक्त २५१ धावा करता आल्या. भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यासह वनडे मालिकाही गमावली आहे.
श्रेयस अय्यरने ५७ चेंडूत ५२ धावा केल्या. पृथ्वी शॉ २४, तर मयांक अगरवाल अवघ्या तीन धावांवर बाद झाला. कोहली १५, राहुल ४, जाधव ९, चहल १० धावा करून बाद झाले. आठव्या विकेटसाठी रवींद्र जाडेजा आणि नवदीप सैनी यांनी सर्वाधिक ७६ धावांची भागिदारी केली. त्यात जाडेजाने ५५, तर सैनीने ४५ धावा ठोकल्या.
५० षटकांत न्यूझीलंडने ८ विकेट्स गमावून २७३ धावा केल्या. मार्टिन गप्टिलने ८ चौकार आणि ३ षटकार ठोकत ७९ चेंडूंत ७९ धावांची खेळी केली. निकोलसच्या साथीने त्याने ९३ धावांची भागीदारी केली. एक बाद १४२ वर असलेल्या न्यूझीलंडची अवस्था आठ बाद १९७ अशी झाली होती. टेलरच्या ७३ धावांच्या नाबाद खेळीमुळे न्यूझीलंडला अडीचशे पार धावसंख्या उभारता आल्या.
वनडे मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला विजय मिळविणे आवश्यक होते. टी-२० मालिकेत ५-० असा क्लीन स्वीप दिल्यानंतर पहिल्या वनडेतही टीम इंडियाने धावांचा डोंगर उभा केला होता, मात्र गोलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीमुळे पराभव स्वीकारावा लागला.
मुंबई : न्यूझीलंडच्या दौर्यावर असलेल्या भारतीय संघाने&....
अधिक वाचा