By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 26, 2021 08:23 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म विभूषण, पद्मश्री आणि पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावर्षी सात दिग्गज खेळाडूंना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकचे के वाय व्यंकटेश (पॅरा स्पोर्ट्समन), हरियाणाचे विरंदर सिंह (रेसलर), उत्तर प्रदेशचे सुधा सिंह (अॅथलेटिक्स), केरळचे माधवन नांबियार (अॅथलेटिक्स), अरुणाचल प्रदेशच्या अंशु जामसेंपा (गिर्यारोहक), पश्चिम बंगालच्या मौमा दास (टेबल टेनिस) आणि तामिळनाडूच्या पी अनिता (बास्केटबॉल) यांचा समावेश आहे.
सुधा सिंह :
उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथील रहिवासी सुधा सिंह ट्रेक अॅण्ड फील्डच्या खेळाडू आहेत. सुधा सिंह 3000 मीटर स्टीपलचेजच्या इव्हेंटमध्ये सहभागी होतात. स्टीपलचेजच्या खेळाडूला अनेक बॅरिअर आणि पानी पार करुन शर्यत पूर्ण करायची असते. अॅथलेटिक्स सुधा सिंह यांना 2010 साली ग्वांग्झू एशियाड स्पर्धेत गोल्ड मेडल मिळालं होतं. तर 2018 साली जकार्ता एशियाड स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. याशिवाय 2012 आणि 2016 मध्ये सुधा यांनी ऑलम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. विशेष म्हणजे त्यांना 2012 साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
मौमा दास :
मौमा दास पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील रहिवासी आहेत. त्यांनी ऑलम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. मौमा यांनी 2018 साली गोल्ड कॉस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये वूमेन्स टीम्स इव्हेंटमध्ये गोल्ड, तर महिला डबल्समध्ये सिल्व्हर पदक मिळवलं आहे. तर 2010 साली दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये वूमेन्स टीममध्ये सिल्व्हर तर महिला डबल्समध्ये कांस्य पदक जिंकलं आहे.
पी अनिता :
पी अनिता यांचं पूर्ण नाव अनिता पॉलदुराई असं आहे. त्या चेन्नई येथे वास्तव्यास आहेत. अनिता एकेकाळी भारतीय महिला बास्केटबॉल संघाच्या कर्णधार होत्या. वयाच्या 19 व्या वर्षी त्या कर्णधार झाल्या होत्या. त्या सलग 18 वर्ष भारतीय संघात कार्यरत होत्या. विशेष म्हणजे अनिता या पहिल्या महिला बास्केटबॉल खेळाडू आहेत ज्यांनी नऊ वेळा एशियन बास्केटबॉल कंफेडरेशन चॅम्पियन्शिपमध्ये भाग घेतला होता. त्यांनी नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये 30 मेडल जिंकले आहेत.
अंशु जामसेंपा :
गिर्यारोहक अंशु जामसेंपा यांचं मुळ गाव अरुणाचल प्रदेशातील आहे. एकाच मोसमात दोन वेळा जगातील सर्वात उंच शिखर असलेलं माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या अंशु या जगातील पहिल्या महिला गिर्यारोहक आहेत. विशेष म्हणजे त्यांनी पाच दिवसात माउंट एव्हरेस्ट सर केल्याचा रेकॉर्ड आहे. त्यांनी 2017 साली हा रेकॉर्ड केला आहे. त्याआधी त्यांनी 2011, 2013 साली माउंट एव्हरेस्ट सर केलं आहे.
ऑस्ट्रेलियाला चितपट केल्यानंतर भारतीय संघ पाहुण्या इंग्लंडविरोधात (Team India vs E....
अधिक वाचा