ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

2 आठवडे द्या, पंड्याला जगातील सर्वश्रेष्ठ ऑल-राऊंडर बनवून दाखवतो - रज्जाक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 28, 2019 03:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

2 आठवडे द्या, पंड्याला जगातील सर्वश्रेष्ठ ऑल-राऊंडर बनवून दाखवतो - रज्जाक

शहर : मुंबई

गुरुवारी मॅनचेस्टरमध्ये वेस्टइंडिजच्या विरोधात हार्दिक पंड्याने जबरदस्त कामगिरी केली. त्याच्या कामगिरीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला. पंड्याने 38 बॉलमध्ये 46 रन केले होते. यानंतर पंड्याने बॉलिंग करताना सुनील एम्ब्रिसला 31 रनवर माघारी पाठवलं. पंड्या हा भारतीय टीममधला एक मोठा खेळाडू आहे. त्याच्या कामगिरीवर जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असतं. त्यातच आता पाकिस्तानच्या एका माजी दिग्गज बॉलरने मोठं वक्तव्य केलं आहे.

पाकिस्तानच्या माजी ऑलराउंडर अब्दुल रज्जाकने पंड्याची कामगिरीवर वक्तव्य केलं आहे. त्याने म्हटलं की, पंड्याच्या खेळीमध्ये काही कमतरजा जाणवते. रज्जाकने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, 'मी 2 आठवड्यात हार्दिक पंड्याला जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ ऑलराउंडर बनवू शकतो.'त्यानं म्हटलं की,' मी भारत आणि वेस्टइंडिज यांचा सामना पाहिला. पहिल्यांदा हार्दिक पंड्याचं मी जवळून निरीक्षण केलं. त्याचं फूटवर्क, बॉडी बॅलेंसमध्ये कमतरता जाणवते.'

रज्जाकने पुढे म्हटलं की, 'जर मी पंड्यावर 2 आठवडे काम केलं तर मी त्याला शिकवण्याचा प्रयत्न करु शकतो. दुबईमध्ये त्याच्यासोबत काम केलं तर मला आशा आहे की, मी त्याला जगातील नंबर वन हिटर बनवू शकतो.'

रज्जाकने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डकडे मागणी केली आहे की, 'जर बीसीसीआयला पंड्यावर काम करायचं असेल तर मी त्यासाठी तयार आहे. 2 आठवड्यात त्याला मी सर्वश्रेष्ठ खेळाडू बनवू शकतो.'

पाकिस्तानकडून खेळताना अब्दुल रज्जाकने त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 46 सामने खेळले आहेत. त्याने एकूण 1946 रन घेत 100 विकेट घेतल्या आहेत. सोबतच 265 वनडे सामन्यांमध्ये त्याने 5080 रनसह 269 विकेट घेतल्या आहेत.

 

मागे

World Cup 2019 : पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर ४९ रननी विजय
World Cup 2019 : पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर ४९ रननी विजय

पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ४९ रननी पराभव झाला आहे. या....

अधिक वाचा

पुढे  

World Cup 2019 : 'पाकिस्तान नको म्हणून, भारत बांगलादेश-श्रीलंकेविरुद्ध मुद्दाम हरेल'
World Cup 2019 : 'पाकिस्तान नको म्हणून, भारत बांगलादेश-श्रीलंकेविरुद्ध मुद्दाम हरेल'

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कप आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. अफगाणिस्तान....

Read more