By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 27, 2019 06:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय वातावरण कायम तापलेले असते. आधी पुलवामा दहशतवादी हल्ला आणि एअर-स्ट्राईक तर त्यानंतर ३७० कलम या मुद्द्यांवरून पाकिस्तान आणि भारता यांच्यात राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले. आता सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे (CAA) भारत आणि पाकिस्तानातील काही प्रसिद्ध व्यक्ती एकमेकांवर आगपाखड करताना दिसत आहेत. या दरम्यान पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियांदाद यांनी एक विचित्र आणि अजब मागणी केली आहे.
“माझे ICC ला असे आवाहन आहे की क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांचे भारत दौरे रद्द करण्यात यावेत. आता आपण बघू या की ICC हे प्रकरण कसे हाताळते. या प्रकरणी ICC योग्य न्याय करते का आणि त्यांच्या कारवाईतून जगात काय संदेश जातो, ते आपण पाहू या. माझी ICC ला अशी विनंती आहे की भारतालाही इतर देशांमध्ये क्रिकेट खेळायला जाण्यापासून रोखायला हवे. भारतात वर्णभेद सुरू आहे. काश्मीरी जनता आणि मुस्लीम यांच्याबाबत द्वेष पसरवला जात आहे. आपण क्रीडापटूंनीदेखील हा मुद्दा उचलून धरला पाहिजे”, असे जावेद मियांदाद एका पाकिस्तानी क्रीडा वेबसाईटशी बोलताना म्हणाले.
“मी सगळ्या देशांना कळकळीची विनंती करतो की साऱ्यांनी माणुसकीच्या बाजूने उभे राहूया आणि भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध करूया. सारं जग हे पाहत आहे आणि सगळे लोक याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेतही याबाबत चर्चा होत आहे. माणसांची पशूंप्रमाणे कत्तल करणाऱ्या भारताविरोधात सगळ्यांनी एकत्र येऊया. भारताला या प्रकाराची लाज वाटली पाहिजे. भारत आता संपलेला आहे”, अशी दर्पोक्ती मियांदादने केली
विस्डेन या क्रीडा संबंधित मासिकाकडून त्याच्या दशकातील उत्कृष्ठ ....
अधिक वाचा