By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 11, 2019 01:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पंजाबविरोधात पोलार्डने 31 चेंडूत दहा षटकारांसह 83 धावांची स्फोटक खेळी केली. काल बुधवारी पोलार्डच्या पत्नीचा वाढदिवस होता. त्याच दिवशी पोलार्डनं स्फोटक खेळी केली. पण पत्नी सामना पाहण्यासाठी उपस्थित नव्हती. अशातच पोलार्डनं विजय मिळवत पत्नीला विजयाचे भन्नाट गिफ्ट दिले आहे. सामन्यानंतर मुलासोबत बोलताना पोलार्डनं याचा खुलासा केला. पोलार्डची पत्नी जीना गर्भवती असल्यामुळे सामना पाहण्यासाठी भारतात आलेली नाही. पोलार्डने सामना सुरू होण्यापूर्वी इन्स्टाग्रामवरून पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. पोलार्ड आणि जीना यांचे 2012 मध्ये लग्न झाले होते. त्यांना दोन आपत्य आहेत. मुलगा सध्या वडिलांसोबत भारतामध्ये आयपीएल सामन्याचा आनंद घेत आहे. तर पत्नीसोबत मुलगी आहे. पत्नी जीवा तिसर्यांदा गर्भवती राहिली आहे.
चार फलंदाज लवकर बाद झाल्याने हा सामना मुंबई हरणार असे वाटत असतानाच लवकर फलं....
अधिक वाचा