By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 16, 2019 08:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पंजाब किंग्ज इलेव्हनचा कर्णधार आर. अश्विनने जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात फार्मात असलेल्या जोस बटलरला चेंडू टाकण्याच्या आधीच क्रिज सोडल्याने धावबाद केले होते. या वादग्रस्त विकेटने क्रिकेट जगातात वादळ उठले होते. बटलर बाद झाल्यानंतर पंजाबने राजस्थानचा विजयाचा घास हिरावून घेतला होता. आज राजस्थान रॉयल्स मोहालीत या पराभवाचे उट्टे काढण्याच्या इराद्याने मैदानात उतणार आहे.
मोहालीच्या मैदानावर राजस्थान विरुद्ध पंजाब हा सामना सुरु आहे. गेल्या सामन्यात राजस्थान तुल्यबळ मुंबईच्या संघावर विजय मिळवला होता. तर पंजाबच्या संघाला मागील सामन्यात या स्पर्धेतील सर्वात अपयशी मानल्या जाणार्या बंगळुरूने पराभूत केले होते. त्यामुळे राजस्थानचा संघ विजयी लय कायम राखणार की पंजाबचा संघ विजयी लयीत परतणार, याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघातून स्टीव्ह स्मिथला वगळण्यात आले असून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू टर्नर याला संधी देण्यात आली आहे.
वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची १५ एप्रिलला घोषणा झाली. त्यामध्ये जवळजवळ काही ख....
अधिक वाचा