ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2020 : राजस्थानची 'रॉयल' सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2020 05:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2020 : राजस्थानची 'रॉयल' सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात

शहर : मुंबई

राजस्थान रॉयल्सने  आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमाची विजयी सुरुवात केली आहे. राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा  16 धावांनी पराभव केला आहे. राजस्थानने चेन्नईला विजयासाठी 217 धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र चेन्नईला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 200 धावाच करता आल्या. चेन्नईकडून फॅफ डु प्लेसीने सर्वाधिक 72 धावा केल्या. तर शेन वॉटसननेही 33 रन्स केल्या. राजस्थानकडून राहुल तेवतियाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या चेन्नईची चांगली सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी मुरली विजय आणि शेन वॉटसन यांच्यात 56 धावांची भागीदारी झाली. चेन्नईला पहिला झटका शेन वॉटसनच्या रुपात लागला. वॉटसन 33 धावा करुन माघारी परतला. वॉटसनला चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही.

यानंतर मुरली विजयही 21 धावा करुन बाद झाला. विजयला श्रेयस गोपालने बाद केले. यानंतर चेन्नईने दोन बॉलवर दोन विकेट गमावले. सॅम करणच्या रुपात चेन्नईला तिसरा धक्का लागला. करणने 17 धावा केल्या. तर पदार्पण केलेल्या ऋतुराज गायकवाडची खराब सुरुवात राहिली. त्याला भोपळाही फोडता आला नाही. करण आणि ऋतुराज या दोघांना राहुल तेवतियाने बाद केले.

एकाबाजूला विकेट जात होते. मात्र वनडाऊन आलेला फॅफ डु प्लेसी एकाकी खिंड लढवत होता. फॅफने केदार जाधवसोबत पाचव्या विकेटसाठी 37 धावा केल्या. यानंतर केदार जाधवही 22 धावा करुन माघारी परतला.

केदारनंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानात आला. धोनीने फॅफला चांगली साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 65 धावा जोडल्या. मात्र फॅफ डु प्लेसिसही बाद झालाफॅफने 7 सिक्स आणि 1 फोरच्या मदतीने 72 धावा केल्या. कर्णधार धोनी 29 धावांवर नाबाद राहिला. राजस्थानकडून राहुल तेवतियाने 3 विकेट्स घेतले. तर जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ आणि टॉम करणने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दरम्यान त्याआधी चेन्नईने नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजी करण्यास भाग पाडले. फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थानची सुरुवात निराशाजनक झाली. यशस्वी जयस्वालच्या रुपात राजस्थानला पहिला झटका लागला. यशस्वीला फार काही करता आले नाही. यशस्वी 6 धावा करुन बाद झाला.त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या संजु सॅमसने स्फोटक खेळी करायला सुरुवात केली. संजुने मैदानात आल्याआल्या मोठे फटके लगावले. दुसऱ्या विकेटसाठी संजु सॅमसन आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथने शतकी भागीदारी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. ही जोडी तोडायला लुंगी एन्गिडीला यश आले. तुफानी खेळी करणाऱ्या संजु सॅमसनला एन्गिडीने बाद केले. संजुने 32 बॉलमध्ये 9 सिक्सच्या मदतीने 74 धावा केल्या.यानंतर डेव्हिड मिलर धावबाद झाला. त्याला भोपळा फोडण्याची संधीही मिळाली नाही. यानंतर राजस्थानने ठराविक अंतराने विकेट गमावले. रॉबिन उथप्पाही 5 धावा करुन माघारी परतला. राजस्थानच्या मध्यक्रमाने सपशेल निराशा केली. मात्र दुसऱ्या बाजूला कर्णधार स्टीव्हन स्मिथ तग धरुन मैदानात उभा होता. स्मिथने दमदार अर्धशतक केले. स्मिथने 69 धावांची चांगली खेळी केली.यानंतर अखेरच्या काही षटकात जोफ्रा आर्चरने जोरदार फटकेबाजी केली. आर्चरने अवघ्या 8 चेंडूत 4 सिक्सच्या मदतीने 27 धावा केल्या. राजस्थानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 216 धावा केल्या. चेन्नईकडून सॅम करणने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर दीपक चहार, लुंगी एन्गिडी आणि पियूष चावला या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

 

मागे

IPL 2020 : राजस्थान रॉयल्ससमोर तगड्या चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान
IPL 2020 : राजस्थान रॉयल्ससमोर तगड्या चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान

आयपीएलच्या 13 व्या मोसमातील ( Indian Premier League ) चौथा सामना आज (22 सप्टेंबर) शारजा येथे खे....

अधिक वाचा

पुढे  

K L Rahul l के एल राहुलचं वादळ, 69 चेंडूत 132 धावा, 3 मोठे विक्रम
K L Rahul l के एल राहुलचं वादळ, 69 चेंडूत 132 धावा, 3 मोठे विक्रम

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार के एल राहुलने (KL Rahul) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Roya....

Read more