By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 20, 2019 12:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
यंदाच्या आयपीएल मोसमात मुंबईकडू खेळलेल्या खेळाडूवर बीसीसीआयने २ वर्षांची बंदी घातली आहे. जम्मू-काश्मीरचा फास्ट बॉलर रसिक सलाम याने चुकीचा जन्म दाखला दिल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. भारताच्या अंडर-१९ टीममधूनही रसिक सलामचं नाव मागे घेण्यात आलं आहे. रसिक सलामऐवजी प्रभात मौर्या याची निवड करण्यात आली आहे. भारताच्या अंडर-१९ टीमच्या ट्राय सीरिजला २१ जुलैपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे.रसिक सलामने डिसेंबर २०१८ साली जम्मू-काश्मीरकडून खेळताना गुवाहाटीविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तसंच २०१९ सालच्या आयपीएलमध्ये रसिक सलाम मुंबईकडून खेळला होता. सलामने २ प्रथम श्रेणी मॅचमध्ये ७ विकेट घेतल्या आणि ४५ रन केल्या.
रसिक सलाम हा आयपीएलमध्ये खेळणारा जम्मू-काश्मीरचा दुसरा क्रिकेटपटू आहे. १७व्या वर्षी आयपीएलमध्ये खेळणारा सगळ्यात लहान क्रिकेटपटू होण्याचं रेकॉर्डही त्याने केलं होतं. या मोसमात दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईने रसिक सलामला संधी दिली होती.
भारताची अंडर-१९ टीम
प्रियम गर्ग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ठाकूर टिळक वर्मा, दिव्यांश सक्सेना, शास्वत रावत, ध्रुव चंद जुरेल (विकेट कीपर), शुभंग हेगडे, रवी बिष्णोई, विद्याधर पाटील, सुशांत मिश्रा, प्रभात मौर्या, समीर रिझवी, प्रगनेश कानपिळेवर, कामरान इक्बाल, प्रियेश पटेल, करण लाल, पुर्णांक त्यागी, अन्शुल खमबोज
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. त्यामुळ....
अधिक वाचा