By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2020 09:34 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. बंगळुरुने पंजाबसमोर विजयासाठी 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पंजाबने 20 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर पूर्ण केलं. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रंगला होता. मात्र निकोलस पूरनने चहलच्या अखेरच्या बॉलवर षटकार खेचत पंजाबला विजय मिळवून दिला.
बंगळुरुने दिलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अतिशय चांगली झाली. के.एल. राहुल आणि मयांक अग्रवालने पंजाबला अतिशय आश्वासक सुरुवात करून दिली. राहुल आणि अग्रवाल यांच्यामध्ये 78 धावांची पार्टनरशीप झाली. त्यानंतर 45 धावांवर असताना चुकीचा फटका मारुन अग्रवाल तंबूत परतला.
त्यानंतर के.एल.राहुलच्या साथीला आलेला किंग बॅट्समन ख्रिस गेलची या मोसमातील ही पहिलीच मॅच होती. सुरुवातीला तो अतिशय सावध पद्धतीने खेळत होता. मात्र त्यानंतर त्याचा जम बसायला सुरुवात झाली. गेलने 45 चेंडूत 53 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याने 5 उत्तुंग षटकार खेचले तर एक बॉल सीमारेषेपार धाडला. के. एल. राहुलने देखील कर्णधारपदाला साजेशी खेळी करत नॉट आऊट 61 रन्स काढल्या. त्याच्या या खेळीत 5 षटकारांसह एका चौकाराचा समावेश आहे.
ख्रिस गेल आणि के.एल.राहुल फटकेबाजी करत असताना सामना 19 व्या ओव्हरमध्येच संपेल असं वाटत असताना बंगळुरुच्या बोलर्सनी मॅचमध्ये रंगत आणली. शेवटची ओव्हर टाकलेल्या चहलने तर कमाल केली. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 2 रन्स लागत असताना देखील त्याने शेवटच्या बॉलपर्यंत सामना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या ओव्हरमध्ये चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात ख्रिस गेल धावबाद झाला. मॅचमध्ये पुन्हा रंगत आली. एका बॉलमध्ये एका रन्सची गरज असताना निकोलस पूरनने चहलला स्ट्रेटला षटकार खेचत पंजाबला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.
इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (Indian Premier League) आज शारजाहच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) सामना पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या आरसीबीने 171 केल्या केल्या. यामध्ये कर्णधार कोहलीने सर्वाधिक 48 धावा केल्या. कोहली वगळता इतर फलंदाजांना आपली छाप पाडता आली नाही.
पंजाबने बंगळुरुला हरवल्यापासून आणखी एकाही मॅचमध्ये विजय संपादन केलेला नाही. तर विराट टीमने पाठीमागच्या 7 मॅचेसमध्ये 5 विजय मिळवले आहेत. आताच्या परिस्थितीत पंजाब टीम गुणतालिकेच्या तळाशी आहे तर बंगळुरु तिसऱ्या क्रमांकावर आहे.
रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुपेक्षा आजच्या मॅचमध्ये पंजाबला विजयाची सर्वांत जास्त आवश्यकता आहे. दोन्ही टीमचा विचार केल्यास पंजाबच्या टीममध्ये असंतुलन असल्याचं दिसून येतं. पंजाबचा धडाकेबाज बॅट्समन ख्रिस गेल आज पुनरागमन करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विराट आणि एबी डिव्हीलियर्सच्या बॅटची जादू बघायला मिळाली तर पंजाबसाठी ती नक्कीच धोक्याची घंटा असणार
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हीलियर्स, पार्थिव पटेल, अॅरॉन फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंह मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे आणि अॅडम झॅम्पा.
किंग्ज XI पंजाब – के.एल.राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, सरफराज खान, मनदीप सिंग, अर्शदीप सिंग, दर्शन नलकंडे, हार्डस विल्जोन, हरप्रीत ब्रार, जगुद्देशा सुचित, करूण नायर, मोहम्मद शमी, निकोलस पुरम, शेल्डन कॉटरेल, ग्लेन मॅक्सवेल, जिमी निशम, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, कृष्णप्पा गौतम.
IPL 2020 या हंगामात आज किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु या....
अधिक वाचा