By Prasad Gangan | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 06:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने जागतीक कसोटी क्रिकेट मधून निवृतीची घोषणा केली आहे. वनडे आणि २०-२० या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपली कारकीर्द वाढवण्यासाठी व त्यामध्येच लक्ष केंद्रीत करण्यासाठी स्टेनने कसोटी क्रिकेट मधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
मी क्रिकेटच्या माझ्या आवडत्या फॉर्मेट मधून निवृत्त होत आहे, पण यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर पुर्णपणे लक्ष केंद्रीत करणार असल्याचे निवृत्तीवेळी स्टेनने सांगितले. आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या स्टेनने २००४ साली इंग्लंड विरुध्द कसोटीमध्ये पदार्पण केले होते. तर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
३६ वर्षीय डेल स्टेनने दक्षिण आफ्रिकेकडुन ९३ कसोटी सामन्यांत २२.९५ च्या सरसरीने ४३९ विकेट घेतल्या आहेत. स्टेनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २६ वेळा एकाच डावात ५ विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून डेलच्या निवृत्तीच्या निर्णयाला दुजोरा दिला. “डेल स्टेनने कसोटीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.” असे ट्वीट दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने केले.
गेल्या काही दिवसांपासून स्टेन दुखापतीमुळे त्रस्त आहे. या दुखापतीमुळेच स्टेन या वर्षीचा विश्वचषक ही खेळू शकला नव्हता
यामुळेच मर्यादित षटकांच्या खेळात आपला ठसा उमटवण्यासाठी आणि आफ्रिका संघाला वनडे व २०-२० विश्वचषक जिंकून देण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्याचे सांगण्यात येते॰
क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या विराट कोहली आणि यष्टीरक्....
अधिक वाचा