ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

World Cup 2019 : युवराज म्हणतो, 'टीम इंडियाला चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन सापडला'

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 03, 2019 10:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30

World Cup 2019 : युवराज म्हणतो, 'टीम इंडियाला चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन सापडला'

शहर : मुंबई

टीम इंडियामध्ये चौथ्या क्रमांकावर कोण बॅटिंग करणार`? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून कर्णधार विराट कोहली, टीम प्रशासन आणि निवड समितीला पडला. अगदी वर्ल्ड कपला सुरुवात झाली तरी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार यावर गोंधळ सुरुच होता.

वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या काही मॅचसाठी केएल राहुल चौथ्या क्रमांकावर आला. पण शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे केएल राहुलला ओपनिंगला यावं लागलं. यानंतर विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर खेळायला मिळालं. पण विजय शंकरला दुखापत झाल्यामुळे ऋषभ पंतला संधी मिळाली.

इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये ऋषभ पंतने ३२ रनची तर बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये ४८ रनची खेळी केली. या दोन्ही इनिंगमध्ये ऋषभ पंतने केलल्या खेळी युवराज सिंगच्या पसंतीस उतरली आहे. 'भविष्यासाठी टीम इंडियाला चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करणारा खेळाडू मिळाला आहे. ऋषभ पंतवर योग्य गुंतवणूक करा आणि त्याला तयार करा,' असं ट्विट युवराज सिंगने केलं आहे.

२०१५ वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाने चौथ्या क्रमांकावर अनेक खेळाडूंना संधी दिली. या क्रमांकावर २०१५ वर्ल्ड कपनंतर युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, मनिष पांडे, एमएस धोनी, अंबाती रायुडू, मनोज तिवारी, विजय शंकर, ऋषभ पंत, विराट कोहली, केएल राहुल, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, केदार जाधव या खेळाडूंना चौथ्या क्रमांकावर संधी दिली. पण कोणत्याच खेळाडूला चमक दाखवता आली नाही.

 

मागे

World Cup 2019 : बांगलादेशला हरवून टीम इंडिया सेमी फायनलमध्ये
World Cup 2019 : बांगलादेशला हरवून टीम इंडिया सेमी फायनलमध्ये

बांगलादेशचा २८ रननी पराभव करून टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये ....

अधिक वाचा

पुढे  

World Cup 2019 : १२ वर्षांपूर्वी निवड, पहिल्यांदाच 'वर्ल्ड कप'ची मॅच खेळणार हा भारतीय खेळाडू
World Cup 2019 : १२ वर्षांपूर्वी निवड, पहिल्यांदाच 'वर्ल्ड कप'ची मॅच खेळणार हा भारतीय खेळाडू

बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिं....

Read more