ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रोहितनं ठोकलेल्या'सिक्सर'नं जखमी झालेल्या महिलेचं असं जिंकलं मन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 06, 2019 04:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रोहितनं ठोकलेल्या'सिक्सर'नं जखमी झालेल्या महिलेचं असं जिंकलं मन

शहर : मुंबई

भारताचा बॅटसमन रोहित शर्मा आयसीसी वर्ल्ड कप मध्ये आपल्या खेळण्यानं क्रिकेट रसिकांची मनं तर जिंकतोयच पण आपल्या वर्तवणुकीतूनही तो हे साध्य करतोय. त्याचं झालं असं की भारत विरुद्ध बांग्लादेश मॅचदरम्यान रोहितनं ठोकलेल्या सिक्सरनं प्रेक्षक आनंदी झाले... पण या सिक्सरमुळे उडालेला बॉल सरळ एका महिलेवर जाऊन आदळला. यामुळे ही महिला थोडी जखमी झाली... पण मॅचनंतर मात्र रोहितनं या महिलेची भेट घेतली आणि तिच्या चेहऱ्यावर आपसूकच खळखळून हसू उमटलं.

भारत विरुद्ध बांग्लादेश मॅच दरम्यान रोहितनं ९२ बॉलमध्ये १०४ रन केले. यावेळी, त्यानं फोर आणि सिक्सरही ठोकले. या दरम्यान त्याच्या एका बॉलमुळे प्रेक्षक गॅलरीत बसलेली एका महिला चांगलीच दुखावली गेली. मॅच पाहता पाहता तिच्यावर बॉल येऊन आदळला होता. भारतीय फॅन असलेल्या या महिलेचं नाव मीना असं आहे. मीनाला बॉल धडकल्याच्या क्षणाचा व्हिडिओ टीव्हीवरही दाखवण्यात आला होता.

पण, आपण ठोकलेल्या बॉलमुळे एक महिला फॅन दुखावली गेल्याची सल रोहितच्या मनाला लागून राहिली होती. त्यामुळे मॅच संपल्यानंतर लगेचच रोहितनं या महिला फॅनची भेट घेतली आणि तिला आपली एक भेटही दिली.रोहितनं या महिलेला आपल्या ऑटोग्राफसहीत पिवळ्या रंगाची एक हॅट या महिलेला भेट म्हणून दिली. या क्षणाचाही एक फोटो समोर आलाय. या फोटोत रोहित मीनाला कदाचित कॅच पकडण्याची कला मजेशीर अंदाजात समजावतोय... तर त्याच्यासमोर उभी असलेली आणि या अनपेक्षित भेटीमुळे आनंदी झालेली मीना खळाळून हसताना दिसतेय. आपल्या फॅन्सना खूश करण्याचा रोहितचा हा अंदाजही प्रेक्षकांना भावलेला दिसतोय. त्यामुळेच तर रोहितचा हा फोटोदेखील व्हायरल होतोय.

                               Rohit Sharma

याच मॅचनंतर रोहितनं ८७ वर्षांच्या भारतीय फॅन चारुलता यांचीही भेट घेतली होती. मंगळवारी झालेल्या या मॅचमध्ये भारतानं बांग्लादेशला २८ रनांनी पछाडत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये रोहितनं चार शतक ठोकलेत. उल्लेखनीय म्हणजे, अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू ठरलाय.

 

मागे

दीमुथ करुणारत्ने ठरला बूमराहच 100 वा बळी सोबत विक्रमाला गवसणी
दीमुथ करुणारत्ने ठरला बूमराहच 100 वा बळी सोबत विक्रमाला गवसणी

आजच्या भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात भारताच्या गोलंदाज जसप्रीत बूमराह य....

अधिक वाचा

पुढे  

World Cup 2019 :इंग्लंड मधील भारतीय खेळाडुंचा सुरक्षा प्रश्न ऐरणीवर
World Cup 2019 :इंग्लंड मधील भारतीय खेळाडुंचा सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

इंग्लंडमध्ये श्रीलंका  विरुद्ध भारत असा सामना सुरू असताना आकाशात मैदाना....

Read more