By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 20, 2019 06:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय टीमचा बॅट्समन रोहित शर्माने त्य़ाच्या टेस्ट करिअरमधील पहिलं दुहेरी शतक ठोकलं आहे. रांचीच्या जेएससीए क्रिकेट मैदानावर त्याने हा कारनामा केला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात रोहितने हा कारनामा केला आहे. रोहित शर्माने 249 बॉलमध्ये 28 फोर आणि 4 सिक्ससह टेस्ट करिअरमधील पहिलं दुहेरी शतक ठोकलं. हिटमॅन रोहित शर्माचा स्ट्राईकरेट 82.33 होता. रोहित शर्माने एकूण 212 रनची खेळी करत भारताला भक्कम स्थितीत आणून ठेवलं.
रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात तिसरं शतक पूर्ण केलं आहे. जो नंतर 200 रनच्या पुढे गेला. रोहित शर्माने सिक्स मारत दुहेरी शतक पूर्ण केलं. याआधी कोणत्याच भारतीय खेळाडूने सिक्स मारत आपलं दुहेरी शकत पूर्ण केलेलं नाही.
32 वर्षाच्या रोहित शर्माने या सिरीजमध्ये तीन शतकांसह 529 रन पूर्ण केले आहेत. रोहित शर्माने भारतासाठी 3 सामन्यांच्या सिरीजमध्ये सर्वाधिक रन करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. याआधी वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानच्या विरुद्ध 2005 मध्ये 500 हून अधिक रन पूर्ण केले होते. ज्यामध्ये एक तिहेरी शतक देखील आहे.
रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध एकाच सिरीजमध्ये सर्वाधिक रन करण्याचा रेकॉर्ड देखील बनवला आहे. याआधी मोहम्मद अजहरुद्दीनने 1996 मध्ये 388 रन केले होते. रोहित शर्मा एका टेस्ट सिरीजमध्ये सर्वाधिक सिक्स ठोकणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये देखील सर्वाधिक सिक्स ठोकणारा तो पहिला खेळाडू बनला आहे.
रोहित शर्माच्या आधी भारतीय टीमकडून वीनू मांकड, बुधी कुंदरन, सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवागने एका टेस्ट सिरीजमध्ये 500 हून अधिक रन केले आहेत. सुनील गावस्कर यांनी 5 वेळा ही कामगिरी केली आहे. रोहित शर्मा पहिल्यांदा टेस्ट सिरीजमध्ये ओपनिंग करत आहे.
सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, वीरेंद्र सेहवाग आणि मुथय्या मुरलीधरन यांच्यासा....
अधिक वाचा