ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

न्यूझीलंड दौ-यासाठी भारतीय संघात रोहितचे कमबॅक 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 13, 2020 03:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

न्यूझीलंड दौ-यासाठी भारतीय संघात रोहितचे कमबॅक 

शहर : देश

        मुंबई - मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या निवड समितीच्या बैठकीत ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. न्यूझीलंड दौ-यातल्या आगामी मालिकेसाठी १६ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली असून येत्या २४ जानेवारीला मालिकेतला पहिला सामना ऑकलंडमध्ये खेळण्यात येईल. 

 

     बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितलं की, "भारतीय टी-20 संघात कोणताही आश्चर्यकारक चेहरा नाही. संजू सॅमसनऐवजी रोहित शर्मा संघात परतला आहे, उर्वरित सर्व खेळाडू संघाता आहेत." श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतल्यानंतर रोहित शर्मा आणि गोलंदाज मोहम्मद शमीचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. तर संजू सॅमसनला मात्र वगळण्यात आलं आहे. तसेच पाठीच्या दुखापतीमुळे भारत(अ) संघातून वगळण्यात आलेल्या हार्दिक पंड्याला या मालिकेसाठी विचारात घेण्यात आलेले दिसत नाही आहे. 

 

न्यूझीलंड दौ-यासाठी भारतीय टी20 संघ - विराट कोहली(कर्णधार ), रोहित शर्मा (उपकर्णधार ), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मानिष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वाशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर 

 

तर, उद्यापासूनच टीम इंडियाची पुढची परीक्षा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात १४ जानेवारी म्हणजेच उद्यापासून मुंबईत होईल. 

 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ - विराट कोहली(कर्णधार ), रोहित शर्मा (उपकर्णधार ), शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केदार जाधव, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, मानिष पांडे, रिषभ पंत (यष्टीचषक) केएल राहुल, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव. 

मागे

२९ मार्चपासून आयपीएलची सुरुवात
२९ मार्चपासून आयपीएलची सुरुवात

           मुंबई - या वर्षीच्या आयपीएल टी-२० हंगामाची सुरुवात २९ मार्चल....

अधिक वाचा

पुढे  

‘वन डे क्रिकेटर ऑफ द इअर 2019’ ठरला हिटमॅन रोहित शर्मा
‘वन डे क्रिकेटर ऑफ द इअर 2019’ ठरला हिटमॅन रोहित शर्मा

           दुबई - आंतरराष्ट्रय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज २०१९ मधील ....

Read more