ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी दणदणीत पराभव

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 13, 2020 10:14 AM 2019-02-12T14:15:30+5:30

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी दणदणीत पराभव

शहर : मुंबई

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी दणदणीत पराभव केला. बंगलोरचा यंदाच्या मोसमातला हा पाचवा विजय ठरला. या सामन्यात बंगलोरनं कोलकात्याला विजयासाठी 195 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. पण बंगलोरच्या प्रभावी माऱ्यासमोर कोलकात्याला 9 बाद 112 धावांचीच मजल मारता आली.

कोलकाताकडून शुबमन गिलने सुरुवातीला चांगली खेळी केली. त्यानंतर मधल्या फळीत आंद्रे रसेलने फटकेबाजीचा प्रयत्न केला. मात्र बंगलोरच्या गोलंदाजांसमोर त्याला मोठी खेळी करता आली नाही. कोलकाताकडून शुभमन गिलने 34, आंद्रे रसेलने 19 आणि राहुल त्रिपाठी 16 धावांनी खेळी केली. इतर खेळांडूंन दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही.  वॉशिंग्टन सुंदरनं आणि ख्रिस मॉरिसनं प्रत्येकी दोन विकेट्स घेऊन बंगलोरच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तर नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल आणि ईसुरु उदाना यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

त्याआधी एबी डिव्हिलियर्ससह बंगलोरच्या आघाडीच्या फलंदाजांनी शारजाच्या मैदानात तुफान फटकेबाजी केली. त्यामुळे बंगलोरला दोन बाद 194 धावांचा डोंगर उभारता आला. डिव्हिलियर्सनं अवघ्या 33 चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 73 धावा फटकावल्या. तर कर्णधार विराटनं नाबाद 33 धावांची खेळी केली. त्याआधी अॅरॉन फिंच आणि देवदत्त पडिक्कलनं 67 धावांची सलामी दिली. फिंचनं 47 तर पडिक्कलनं 32 धावा केल्या.

रसेलच्या टी20त विकेट्सचं त्रिशतक

कोलकाता नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेलनं ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केला. बंगलोरविरुद्धच्या सामन्यात रसेलनं पडिक्कलची विकेट घेत ट्वेन्टी ट्वेन्टीत 300 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो जगातला दहावा तर तिसरा वेस्ट इंडियन खेळाडू ठरला. 337 व्या सामन्यात रसेलनं हा विक्रमी टप्पा गाठला.

मागे

IPL 2020 : चेन्नईच्या पाचव्या पराभवानंतर धोनी संतापला; 'या' खेळाडूंवर फोडलं खापर
IPL 2020 : चेन्नईच्या पाचव्या पराभवानंतर धोनी संतापला; 'या' खेळाडूंवर फोडलं खापर

इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (Indian Premier League) शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात रॉयल च....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2020, SRH vs CSK : चेन्नई सुपर किंग्जसची सनरायजर्स हैदराबादवर 20 धावांनी मात
IPL 2020, SRH vs CSK : चेन्नई सुपर किंग्जसची सनरायजर्स हैदराबादवर 20 धावांनी मात

चेन्नई सुपर किंग्जसने (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) 20 धावांनी मात ....

Read more