By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 21, 2020 11:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरने आयपीएल 2020 मध्ये विजयी सलामी दिली आहे. बंगलोरने सनरायजर्स हैदराबादचा 10 धावांनी पराभव केला. फिरकीपटू युजवेंद्र चहलने घेतलेली जॉनी बेअरस्टॉ आणि विजय शंकरची विकेट गेम चेन्जिंग ठरली. बेअरस्टॉने 43 चेंडूत 61 धावांची खेळी केली. मनीष पांडेने 34 धावांची तर प्रियांम गर्ग 12 धावांची खेळी केला. मात्र हैदराबादच्या इतर एकाही खेळाडूला दोन आकडी धावाही करता आल्या नाही. बंगलोरकडून युजवेंद्र चहलने सर्वाधित 3 विकेट घेतल्या. तर नवदीप सैनी आणि शिवम दुबेने प्रत्येकी दोन-दोन, डेल स्टेनने एक विकेट घेतली.त्याआधी हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगलोरकडून अॅरोन फिन्च आणि देवदत पड्डिकल यांनी सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 90 धावांच्या पार्टनरशिप केली. पदार्पणातच देवदत्त पड्डिकले अर्धशतक ठोकलं. त्याने 42 चेंडूत 56 धावांची धमाकेदार खेळी केली. फिन्चने 29 धावा करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र त्यानंतर आलेल्या एबी डी विलियर्सने 30 चेंडूत 51 धावांची तुफानी खेळी करत हैदराबादसमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं. हैदराबादकडून थंगरसु नटराजन, विजय शंकर आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
20 वर्षीय डावखुरा फलंदाज देवदत्त पड्डिकल कर्नाटककडून डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळतो. गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी -20 ट्रॉफीतून टी -20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होते. देवदत्तच्या नावे 12 टी-20 सामन्यांमध्ये 175.75 च्या स्ट्राइक रेटने 580 धावा आहेत.
2019-20 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये देवदत्त पड्डिकलने केवळ 11 डावांमध्ये 67.66 च्या सरासरीने 609 धावा केल्या. ज्यामध्ये दोन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी सय्यद मुश्ताक अली टी -20 ट्रॉफीत पड्डिकलने 580 धावा केल्या. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या होत्या.
संयुक्त अरब अमिरात...म्हणजेच यूएई. मध्यपूर्वेतील याच संपन्न देशात पुढचे जवळ....
अधिक वाचा