ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2020 : राजस्थान रॉयल्ससमोर तगड्या चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 22, 2020 05:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2020 : राजस्थान रॉयल्ससमोर तगड्या चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान

शहर : मुंबई

आयपीएलच्या 13 व्या मोसमातील ( Indian Premier League ) चौथा सामना आज (22 सप्टेंबर) शारजा येथे खेळण्यात येणार आहे. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जस (Chennai Super Kings) यांच्यात हा सामना होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.चेन्नईचा हा या मोसमातील दुसरा सामना आहे. तर राजस्थानचा पहिला सामना आहे. चेन्नईने या मोसमातील पहिल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव केला. त्यामुळे राजस्थान विरुद्ध विजय मिळवून विजयी घौडदौड कायम ठेवण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल. तर मोसमातील पहिली मॅच जिंकून विजयी सलामी करण्याचा मानस राजस्थानचा असेल.

राजस्थानवर चेन्नई वरचढ

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत राजस्थान आणि चेन्नई हे दोन्ही एकूण 21 वेळा भिडले आहेत. यामध्ये चेन्नईचा वरचश्मा राहिला आहे. चेन्नईने 21 सामन्यांपैकी 14 सामन्यात राजस्थानवर विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 7 वेळा चेन्नईचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे राजस्थानने आयपीएलचं पहिलं विजेतेपद पटकावलं होतं. मात्र यानंतर राजस्थानला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. दुसऱ्या बाजूला चेन्नईने 3 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे.

चेन्नईचा तगडी बॅटिंगलाईन

चेन्नईच्या फलंदाजीची जबाबदारी मुरली विजयी, शेन वॉटसन, फॅफ डु प्लेसिस, अंबाती रायुडू, केदार जाधव यांच्या खांद्यावर असेल. मुंबईविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात वॉटसन आणि मुरली विजयला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे चेन्नईला या सामन्यात सलामीच्या फलंदाजांकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असणार आहे. तसेच मुंबईविरुद्ध रायुडू आणि फॅफने दमदार अर्धशतक केले होते. यामुळे राजस्थानविरोधातही अशाच दमदार खेळी रायुडू आणि फॅफकडून अपेक्षित असणार आहे.

महेंद्रसिंह धोनी गेल्या वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर आहे. धोनी निवृत्तीनंतर आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने मैदानात उतरलेला आहे. यामुळे धोनीची फटकेबाजी पाहण्यासाठी धोनी समर्थक आतुर आहेत.तसेच चेन्नईच्या गोलंदाजीची जबाबदारी पियूष चावला, रवींद्र जडेजा आणि दीपक चाहर या फिरकीपटूंच्या तिकडीवर असणार आहे.

हरभजन आणि रैनाची माघार

चेन्नईचा फिरकीपटू हरभजन सिंह आणि विस्फोटक अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलच्या 13 व्या मौसमातून वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. त्यामुळे यंदा मिस्टर आयपीएल म्हणजेच रैनाची फटकेबाजी पाहता येणार नाही.

जॉस बटलर आणि बेन स्टोक्सची अनुपस्थिती

राजस्थान रॉयल्स आपल्या 2 महत्वाच्या अनुपस्थितीत मैदानात उतरणार आहेत. जॉस बटलर आणि बेन स्टोक्स यांना या सलामीच्या सामन्याला मुकावे लागणार आहे. वडिलांची प्रकृती स्थिर नसल्याने बेन स्टोक्स न्यूझीलंडमध्ये आहे. बटलर आपल्या कुटुंबियांसोबत आल्याने त्याला 36 तास क्वारंटाईन रहावे लागणार आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंचा राजस्थानच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश नसणार आहे. त्यामुळे या दोघांच्या अनुपस्थितीत राजस्थान कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असणार आहे.

स्टीव्ह स्मिथ ठणठणीत