ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सोशल मीडियावरील अफवा त्वरित रोखा केंद्राकडून राज्यांना सूचना

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2019 06:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सोशल मीडियावरील अफवा त्वरित रोखा केंद्राकडून राज्यांना सूचना

शहर : देश

           नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आसामपासून देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना अॅरडव्हायजरी जारी केली आहे. देशातील नागरिकांची सुरक्षा आणि रक्षा महत्त्वाची असल्याने हिंसक आंदोलनाला आळा घाला. तसेच फेक न्यूज आणि सोशल मीडियावरील अफवा त्वरित रोखा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत.


           दरम्यान, सोशल मीडियावरील अफवा आणि फेक न्यूज रोखण्यासाठी कायद्यानुसार कारवाई करा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत. सोशल मीडियावरील अफवांमुळेच राज्यांमध्ये आंदोलने सुरू असल्याचेही केंद्राचे म्हणणे आहे. 


           नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून आसाम, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये उग्र आंदोलन सुरू आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातही हे आंदोलन सुरू झाले आहे. तर दिल्लीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठिचार्जच्या निषेधार्थ मुंबई विद्यापीठातही निदर्शने करणत आली असून राज्याच्या अनेक भागात या आंदोलनाचे लोण पसरत आहे. काही ठिकाणी सार्वजनिक मालमत्तांचे नुकसानही करण्यात आले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी राज्यांनी तातडीने उपायोजना करायला हव्यात. 
 

मागे

आशियाई पदक विजेत्या प्राजक्ताचे महिलांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण
आशियाई पदक विजेत्या प्राजक्ताचे महिलांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण

देशात महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा विरोध करण्यासाठी आशियाई पदक विजेता ....

अधिक वाचा

पुढे  

IPL Auction  : हे खेळाडू झाले मालामाल
IPL Auction : हे खेळाडू झाले मालामाल

आयपीएल लिलाव प्रवीण तांबे- २० लाख रुपये- कोलकाता ओशेन थॉमस- ५० लाख रुपये- र....

Read more