ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी सचिनचा कॅप्टन विराट कोहलीला सल्ला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 15, 2019 04:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी  सचिनचा कॅप्टन विराट कोहलीला सल्ला

शहर : मुंबई

न्यूझीलंड विरुद्धची मॅच रद्द झाल्यानंतर टीम इंडिया आपली पुढील मॅच 16 जून रोजी खेळणार आहे. ही मॅच पांरपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळली जाणार आहे. त्यामुळे या मॅचकडे संपूर्ण क्रीडाजगताचं लक्ष लागलं आहे. पाकिस्तान विरुद्धच्या मॅचसाठी सचिन तेंडुलकरने कॅप्टन विराट कोहलीला सल्ला दिला आहे.पाकिस्तानचा वेगवान बॉलर मोहम्मद आमिरच्या माऱ्या विरुद्धात सतर्क राहा. तसेच आमिरच्या बॉ़लिंगवेळी आक्रमकपणे खेळण्याचा सल्ला देखील सचिनने दिला आहे.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यानंतर सचिनने एका वृत्तवाहिनीकडे प्रतिक्रिया दिली. सचिन म्हणाला, 'रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे टीम इंडियाचे अनुभवी खेळाडू आहेत. या दोघांना लवकरात लवकर आऊट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा असेल.' वहाब रियाज आणि मोहम्मद आमिर या दोन्ही बॉलर्सचा सुरुवातीला विकेट घेण्याचा प्रयत्न असेल.

सचिन म्हणाला, असं असलं तरी, रोहित आणि विराट या दोघांनी चांगली खेळी करण्यावर लक्ष द्यायला हंव.' पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये अवघ्या 30 रनच्या मोबदल्यात 5 विकेट घेतल्या होत्या.

'खेळाडूंना संधी मिळाल्यावर त्यांनी फटकेबाजी करावी. मैदानात खेळताना सकारात्मक राहा, तसेच बॉडीलँग्वेज देखील सकारात्मक असु द्या. आपल्याला वेगळं काही करण्याची गरज नाही. आपल्या बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग अशा प्रत्येक विभागानुसार आपल्याला आक्रमक रहायला हवे.' असा सल्ला देखील सचिनने दिला.

 

 

मागे

Ind vs Pak:'मौका मौका'ची ही नवी जाहिरात पाहिलीत का?
Ind vs Pak:'मौका मौका'ची ही नवी जाहिरात पाहिलीत का?

इंग्लंडमध्ये सुरु असणाऱ्या क्रिकेट विश्वचषकातील भारत वि. पाकिस्तान हा बहु....

अधिक वाचा

पुढे  

World Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामन्यावरही पावसाचं सावट
World Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामन्यावरही पावसाचं सावट

२०१९ वर्ल्ड कपला सुरुवात झालेली असली, तरी पावसाने मात्र या स्पर्धेचा खेळखं....

Read more