By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 16, 2020 01:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पेटीएमची सहयोगी कंपनी पेटीएम फर्स्ट गेम्सने (पीएफजी) मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवलं आहे. पेटीएमने मंगळवार (15 सप्टेंबर) जारी केलेल्या वक्तव्यात म्हटलं की, "सचिन तेंडुलकर हे अब्जावधी क्रिकेटप्रेमींमधील एक लोकप्रिय नाव आहे. देशामध्ये रोमांचक फॅण्टसी खेळांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. केवळ फॅण्टसी क्रिकेटच नाही तर कबड्डी, फुटबॉल आणि बास्केटबॉल यांसारख्या खेळांमध्येही पीएफजीला लोकप्रिय बनवण्यासाठी मदत करु शकतात."परंतु या निर्णयाला देशातील छोट्या व्यावसायिकांनी विरोध करत, सचिन तेंडुलकरने आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंतीही केली आहे. देशातील छोट्या व्यापाऱ्यांची संस्था कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) यासंदर्भात सचिन तेंडुलकरला पत्र लिहून आपला विरोध दर्शवला आहे. सीएआयटीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सचिनला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "तुमच्या या निर्णयामुळे देशात आक्रोश आहे, कारण ज्या कंपनीने तुम्हाला ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवलं आहे, त्यामध्ये चीनची कंपनी अलिबाबाची गुंतवणूक आहे. पेटीएम फर्स्ट गेम्स पेटीएम आणि अलिबाबाची कंपनी एजी टेक यांचं जॉईंट व्हेंचर आहे."
निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती
प्रवीण खंडेलवाल यांनी पुढे लिहिलं आहे की, "सीमेवरील झटापटीत आपले 20 जवान शहीद झाले आणि सीमेवर चीन वारंवार आक्रमकता दाखवत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही चीनची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनण्याचा निर्णय घेतला, जो देशातील लोकभावनेच्या विरोधात आहे. तुमच्यासारखा लोकप्रिय खेळाडू लोकभावना समजण्यास कसा काय अपयश ठरला हे समजत नाही. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की, कृपया तुम्ही आपल्या या निर्णयावर फेरविचार करा आणि प्रस्ताव स्वीकारु नका. याद्वारे चीनला कठोर संदेश जाईल की, या कठीण प्रसंगात तुम्ही देशासोबत उभे आहात."
टेलीकॉम ऑपरेटर कंपनी वोडाफोन-आइडिया (Vi) Dream11 IPL 2020 ची को-स्पॉन्सर बनली आहे. IPL 2020 ....
अधिक वाचा