ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

४४व्या वर्षी चंद्रपॉलचा विक्रम! टी-२०मध्ये झळकावलं द्विशतक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 08, 2019 08:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

४४व्या वर्षी चंद्रपॉलचा विक्रम! टी-२०मध्ये झळकावलं द्विशतक

शहर : मुंबई

इंडिजचा क्रिकेटपटू शिवनारायण चंद्रपॉलने वयाच्या ४४व्या वर्षी क्रिकेटमध्ये नवा विक्रम केला आहे. स्थानिक टी-२० स्पर्धेमध्ये चंद्रपॉलने द्विशतक झळकावलं आहे. चंद्रपॉलने सेंट मार्टिनमध्ये एडम सॅनफोर्ड क्रिकेट फॉर लाईफ टी-२० स्पर्धेत ७६ बॉलमध्ये द्विशतक पूर्ण केलं. ४४व्या वर्षी टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा चंद्रपॉल हा एकमेव खेळाडू आहे.चंद्रपॉलने त्याच्या ७६ बॉलच्या खेळीमध्ये २५ फोर आणि १३ सिक्स लगावले. चंद्रपॉलने त्याच्या इनिंगची सुरुवात स्मिथसोबत केली. स्मिथनेही चंद्रपॉलला चांगली साथ दिली. स्मिथने २९ बॉलमध्ये ५४ रनची खेळी केली. स्मिथच्या खेळीमध्ये फोर आणि सिक्सचा समावेश होता. चंद्रपॉलच्या द्विशतकामुळे २० ओव्हरमध्ये टीमचा स्कोअर ३०२ रन एवढा झाला. चंद्रपॉलच्या टीमने ही मॅच १९२ रननी जिंकली.

स्पर्धा असल्यामुळे चंद्रपॉलच्या या विक्रमी खेळीची क्रिकेट रेकॉर्डमध्ये गणना होणार नाही. तीन वर्षांपूर्वीच चंद्रपॉलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी स्थानिक क्रिकेटमध्ये अजूनही चंद्रपॉल खेळत आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमात चंद्रपॉल खेळला होता. यानंतर मात्र तो आयपीएलमध्ये पुन्हा दिसला नाही

मागे

IPL 2019: बंगळुरूची हाराकिरी सुरूच, मोसमातला सलग सहावा पराभव
IPL 2019: बंगळुरूची हाराकिरी सुरूच, मोसमातला सलग सहावा पराभव

बंगळुरूने यंदाच्या आयपीएल मोसमातली आपली निराशाजनक कामगिरी सुरुच ठेवली आह....

अधिक वाचा

पुढे  

विराटला आराम द्या, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा बीसीसीआयला सल्ला
विराटला आराम द्या, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा बीसीसीआयला सल्ला

  कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरूची यंदाच्या आयपीएलमध्ये पराभवाची मालिका क....

Read more