ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शोएब अख्तरकडून गांगुलीचं कौतुक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2019 02:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शोएब अख्तरकडून गांगुलीचं कौतुक

शहर : मुंबई

सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. २३ ऑक्टोबरला गांगुली अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारेल. गांगुलीच्या या नव्या भूमिकेसाठी सीमेपलीकडून शोएब अख्तरने शुभेच्छा दिल्या आहेत. गांगुलीने कर्णधार झाल्यानंतर भारतीय क्रिकेट बदललं आता अध्यक्ष झाल्यानंतरही असेच बदल होतील, असं शोएब म्हणाला आहे. एवढच नाही तर शोएबने गांगुलीची तुलना इम्रान खानशी केली आहे.

शोएब अख्तर आयपीएलमध्ये कोलकात्याकडून गांगुलीच्या नेतृत्वात खेळला आहे. कठीण काळामध्ये गांगुलीने खेळाडूंना साथ दिली आणि त्यांची मानसिकता बदलली. त्याने भारतीय क्रिकेटमध्येही बदल केले कारण त्याच्याकडे चांगलं ज्ञान आहे, अशी स्तुती शोएबने केली.

शोएब अख्तरने सौरव गांगुली आणि पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांची तुलना केली. या दोघांची नेतृत्व शैली एकसारखी आहे. सौरवचे नेतृत्व गूण इम्रानसोबत जुळतात. आमच्या पंतप्रधानांकडेही हे गूण आहेत आणि सौरवकडेही, असं शोएब म्हणाला.

आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना शोएबने सांगितलं, 'भारतीय क्रिकेटमध्ये गांगुलीमुळेच बदल आला. १९९७-९८ मध्ये भारत कधी पाकिस्तानला पराभूत करेल, असं मला वाटलं नव्हतं. भारताकडे तशी सिस्टिमचं नव्हती, असं मला वाटायचं, पण सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटची मानसिकता बदलून टाकली.'

'सौरव गांगुली मला घाबरायचा, असं अनेकांना वाटतं. त्याला माझ्या बॉलिंगवर हुक आणि पूल मारताना अडचण यायची, पण तो मला घाबरायचा हे बोलणं चुकीचं ठरेल. जर असं असतं, तर त्याने माझ्याविरुद्ध ओपनिंगला बॅटिंग केली नसती', अशी प्रतिक्रिया शोएबने दिली.

मागे

सौरव गांगुली होणार BCCI चे नवे अध्यक्ष?
सौरव गांगुली होणार BCCI चे नवे अध्यक्ष?

माजी कर्णधार सौरव गांगुली यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता भारतीय क्र....

अधिक वाचा

पुढे  

सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड
सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड

सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. २३ ऑक्टोबरला गांगुल....

Read more