By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 04, 2020 01:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : guwahati
गुवाहाटी - भारत आणि श्रीलंका यांच्यात रविवारी टी 20 मालिकेतील पहिला सामना आसामच्या गुवाहटी येथे खेळला जाणार आहे. हा सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या प्रेक्षकांना पैसे, मोबाईल आणि गाडीची चावी वगळता इतर वस्तू सोबत घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. प्रेक्षकांना आपल्यासोबत कोणत्याही प्रकारचं पोस्टर किंवा बॅनर स्टेडियमध्ये घेऊन जाता येणार नाहीत. याशिवाय प्लेकार्ड्सही चालणार नाहीत. इतकेच काय तर साधा ‘मार्कर’ देखील घेऊन जाता येणार नाही.
गेल्या काही दिवसांपासून आसाममधील सामाजिक आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून या कायद्याच्या विरोधात आसाममध्ये अनेक आंदोलनं ककरण्यात आली. या सर्व घडामोडी घडत असतानाच रविवारी आसामच्या गुवाहाटी येथे नियोजित आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे.
आसाममधील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी बघता या सामन्यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा सामना बघायला येणारे आंदोलक पोस्टर किंवा बॅनर घेऊन स्टेडियममध्ये निदर्शने देऊ शकतात या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘गुवाहाटी येथे रविवारी भारत आणि श्रीलंकामध्ये होणारा क्रिकेट सामना हा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्यामुळे फक्त आसामचेच नाही तर इतरही लोक चिंतेत आहेत’, असं देवजित सैकिया म्हणाले आहेत. सैकिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेडियममध्ये ‘मार्कर’ घेऊन जाण्यासही बंदी असणार आहे. त्याचबरोबर पुरुषांना त्यांचे पाकिट, महिलांना त्यांची हँडबॅग, मोबाईल आणि वाहनाची चावी घेऊन जाण्याची अनुमती राहणार आहे.
भारतीय क्रिकेट खेळाडू हार्दिक पांड्या आपल्या लव्ह ल....
अधिक वाचा