By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2023 11:38 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
दुसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी टीमला मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी टीमचा कर्णधार अचानक बदलण्यात आला असून या सामन्यात दुसऱ्या खेळाडूवर टीमची धुरा सोपवण्यात आली आहे.
3 जानेवारी 2024 रोजी टीम इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा टेस्ट सामना रंगणार आहे. पहिल्या टेस्ट सामन्यात झालेल्या दारूण पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया तयार आहे. मात्र दुसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी टीमला मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी टीमचा कर्णधार अचानक बदलण्यात आला असून या सामन्यात दुसऱ्या खेळाडूवर टीमची धुरा सोपवण्यात आली आहे.
ईएसपीएनने दिलेल्या बातमीनुसार, टेम्बा बावुमा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमधून बाहेर पडला आहे. बॉक्सिंग डेच्या सामन्यातही तो मैदानाबाहेर दिसला होता. टेम्बा बावुमाच्या अनुपस्थितीत सेंच्युरियनमध्ये 185 रन्सची मॅचविनिंग इनिंग खेळणाऱ्या डीन एल्गरकडे कारकिर्दीतील शेवटच्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेची कमान सोपवण्यात आलीये. बावुमाच्या जागी झुबेर हमजाचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) जवळपास दोन वर्षांनी यावर्षी भारतात पुन्हा आयोजि....
अधिक वाचा