By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 18, 2020 03:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
मुंबई - भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने आई झाल्यानंतर दोन वर्षांनी टेनिस कोर्टवर पाऊल ठेवले. तिने दुहेरीचे अजिंक्यपद मिळवत जोरदार पुनरागमन केले आहे. सानियाने होबार्ट इंटरनॅशनल टूर्नामेंटच्या महिला दुहेरी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. तब्बल दोन वर्षांनी सानिया मिर्झाने आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुनरागमन केले आहे. सानियाचे हे दुहेरीमधले ४२ वे विजेतेपद ठरले.
Sania Mirza staged a winning comeback on the tennis court as she along with her Ukranian partner Nadia Kichenok on Saturday won the Hobart International tournament.
— ANI Digital (@ani_digital) January 18, 2020
Read @ANI Story | https://t.co/NSsOTsk5q5 pic.twitter.com/3mqvcn1PKH
सानियाने आपली युक्रेनची जोडीदार नादीया किचनॉकच्या साथीने दुहेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सानिया-नादीया जोडीने चीनच्या शुई पेंग आणि शुई झँग जोडीचा ६-४, ६-४ ने धुव्वा उडवला. अवघ्या १ तास २१ मिनिटांत सानिया-नादीया जोडीने हा सामना सहज जिंकला.सानियाच्या नावावर २०१६ चे ऑस्ट्रेलियन ओपनचे महिला दुहेरी आणि २००९चे मिश्र-दुहेरी स्पर्धेचे जेतेपदही नावावर केले आहे. सानियाने २०१७ मध्ये चीन ओपन स्पर्धेत तिने शेवटचा सामना खेळला होता.
मुंबई - टीम इंडियाचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचं व....
अधिक वाचा