ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा, स्लेजिंगनंतर असं म्हणाला होता कोहली

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 22, 2020 10:08 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा, स्लेजिंगनंतर असं म्हणाला होता कोहली

शहर : मुंबई

आयपीएल -13 मध्ये 28 ऑक्टोबरला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान सूर्यकुमार आणि विराट कोहली समोरासमोर आले होते. यावर सूर्यकुमार यादवने खुलासा केला आहे. सामन्यादरम्यान, बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली सुर्यकुमारला भडकवण्याचा प्रयत्न करत होता. पण सूर्यकुमारने संयम राखला आणि कोहलीकडे दुर्लक्ष केलं.

हा सामना जिंकताच सूर्यकुमारने कोहलीकडे पाहिले आणि विचारले, "सर्व काही ठीक आहे काय?" सूर्यकुमारच्या चाहत्यांना हे खूपच आवडले, त्याचे कारण म्हणजे त्यांनी नकारात्मक टीकेला सकारात्मक मार्गाने प्रतिसाद दिला. सामन्यात सूर्य कुमारने 79 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

सूर्यकुमार यादव म्हणाला की, 'मी प्रत्येक सामन्यात विराटला ऊर्जेसोबत खेळताना पाहिले आहे. मुंबई विरुद्ध त्या सामन्यातच तो तसा होता असे नाही. जेव्हा तो भारताकडून खेळतो, फ्रँचायझी क्रिकेट खेळतो किंवा कोणत्याही संघाविरूद खेळतो तेव्हा तो तितकाच आक्रमक आणि उत्साही असतो'.

'बंगळुरूसाठी हा महत्वाचा सामना होता. सामन्यानंतर तो पुन्हा सामान्य झाला होता. त्यांनी मला म्हटलं की, तू चांगला खेळलास. पण त्यावेळी ही घटना इतकी चर्चेत येईल असं वाटलं नव्हतं.'

मागे

त्यालाच जाऊन विचारा ! रोहितच्या दुखापतीबाबतच्या प्रश्नावरुन 'दादा' भडकला
त्यालाच जाऊन विचारा ! रोहितच्या दुखापतीबाबतच्या प्रश्नावरुन 'दादा' भडकला

हिटमॅन रोहित शर्मा, टीम इंडियाचा (Rohit Sharma)तडाखेबाज फलंदाज. आयपीएलच्या 13 व्या म....

अधिक वाचा

पुढे  

Phillip Hughes: आजच्याच दिवशी बाउंसरने घेतला होता फिलिप ह्यूजचा बळी, #63notout ट्रेंड!
Phillip Hughes: आजच्याच दिवशी बाउंसरने घेतला होता फिलिप ह्यूजचा बळी, #63notout ट्रेंड!

क्रिकेटच्या मैदानावर होणाऱ्या विक्रमांची चर्चा मोठ्या प्रमाणात केली जा....

Read more