ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पोटाला चिमटा, कर्ज काढून रायफल, पण लेकाने पांग फेडले, पदकवीर स्वप्नील कुसाळेचे मायबाप भावूक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2024 09:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पोटाला चिमटा, कर्ज काढून रायफल, पण लेकाने पांग फेडले, पदकवीर स्वप्नील कुसाळेचे मायबाप भावूक

शहर : कोल्हापूर

Swapnil Kusale : पोटाला चिमटा, कर्ज काढून रायफल, पण लेकाने पांग फेडले, पदकवीर स्वप्नील कुसाळेचे मायबाप भावूक

कोल्हापूर : वडील प्राथमिक शिक्षक. त्यामुळे फारसा पगार नाही. घरची श्रीमंती नाही. गावही शहरापासून दूर. ना सुविधा ना सोयी. तरीही त्यांनी मुलाला नेमबाज करायचे ठरविले. अर्थात, यासाठीचा खर्च मोठा होता. तरीही ते डगमगले नाहीत. पोटाला चिमटा काढावा लागला, तरी चालेल; पण मुलाचे स्वप्न पूर्ण करायचेच, या ध्येयाने त्यांना पछाडले. कर्ज काढून रायफल घेतली. मदतीसाठी अनेक लोकप्रतिनिधी, संस्थाच्या दारोदारी हेलपाटे घातले; पण मुलाला काही कमी पडू दिले नाही. अखेर नेमबाज स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमधील ५० मीटर रायफल थ्री-पोझिशनमध्ये ब्राँझपदक मिळवून वडिलांचे स्वप्न साकार केले. मुलाने पांग फेडले, अशा शब्दांत वडील सुरेश कुसाळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कारकिर्दीसाठी सोसला दुरावा

स्वप्नीलने गुरुवारी ऑलिम्पिक पदक जिंकले. यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. खासदारांपासून ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वांनीच त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला; पण हे ध्येय गाठण्यासाठी स्वप्नीलने घेतलेले कष्ट खरंच कौतुकास्पद आहेत. त्याची जिद्द, इच्छाशक्ती आणि मेहनत यामुळेच हे यश मिळाले. यामागे त्याच्या आई-वडिलांचे कष्टही तितकेच महत्त्वाचे आहेत. कांबळवाडी गाव कोल्हापूरपासून दूर आहे. यामुळे अशा गावात नेमबाजीचे प्रशिक्षण शक्यच नव्हते. कारण तेथे ना सुविधा ना सोयी. अशा वेळी लहानपणापासूनच नेमबाजीची आवड असणाऱ्या स्वप्नीलला त्यांनी बाहेरच ठेवले.

प्रतिकूल परिस्थिती झेलली

नेमबाजीत कारकीर्द म्हणजे खर्च मोठा. रायफल, गोळ्या याचा खर्च न परवडणारा. मग, त्यांनी ही रायफल कर्ज काढून घेतली. अनेक लोकप्रतिनिधी विविध संस्था यांना भेटून मदत मिळवली. अनेकांनी मदतही केली. कोल्हापूर हे नेमबाजीसाठी प्रसिद्ध. येथे जयसिंग कुसाळे, तेजस्वीनी सावंत, राधिका बराले, राही सरनोबत, नवनाथ फडतारे, संदीप तरटे, फुलचंद बांगर असे अनेक नेमबाज घडले. या सर्वांनीच चमकदार कामगिरी केली; पण त्यांना ऑलम्पिकमध्ये यश मिळाले नाही. जागतिक नेमबाजी स्पर्धेत त्यांनी पदके घेतली. मात्र, ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न काही केल्या पूर्ण होत नव्हते. खाशाबा जाधव यांनी कुस्तीत ऑलम्पिकमध्ये १९५२मध्ये ब्राँझपदक मिळवले होते. त्यानंतर ७२ वर्षांनी कोल्हापूरला पदक मिळवून देऊन स्वप्नीलने कोल्हापूरकरांना आगळी वेगळी भेट दिली आहे. त्यामुळेच कोल्हापूरकरांना त्याचा अभिमान आहे.

ऑलम्पिकमध्ये यश मिळविण्याचे स्वप्नीलचे स्वप्न होते. अर्थात, कोल्हापूर ते पॅरिस हा प्रवास सोपा नव्हता. त्याचा खर्च मोठा होता. त्याला नोकरी अलीकडे लागली; पण त्यापूर्वीचा खर्च आम्हाला न परवडणारा होता. एक वेळ उपाशी राहू; पण तुला कमी पडू देणार नाही, असा शब्द त्याला दिला. त्यानेही सण, गाव, मित्र या पलिकडे जाऊन एकच ध्येय ठेवत अखेर यशाला गवसणी घातलीच.

- अनिता कुसाळे, स्वप्नीलची आई

मागे

'मी अजून काय करणं अपेक्षित आहे? मी कधीच...',कोहलीवर भडकला मोहम्मद शमी;म्हणाला,'तुम्ही मला..'
'मी अजून काय करणं अपेक्षित आहे? मी कधीच...',कोहलीवर भडकला मोहम्मद शमी;म्हणाला,'तुम्ही मला..'

Mohammed Shami Slams Virat Kohli Ravi Shastri: भारतीय संघासंदर्भात भाष्य करताना वेगवान गोलंदाज मोहम्मद....

अधिक वाचा

पुढे  

पुणे टेस्टमध्ये पराभवानंतर टीम इंडियापासून वेगळे झाले रोहित आणि विराट, मॅच संपल्यावर घेतला निर्णय
पुणे टेस्टमध्ये पराभवानंतर टीम इंडियापासून वेगळे झाले रोहित आणि विराट, मॅच संपल्यावर घेतला निर्णय

पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा फार नाराज झाला. तर विराट कोहली ....

Read more