By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 03, 2020 01:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई : न्यूझीलंडचा टी-२० सीरीजमध्ये टीम इंडियाने पराभव करून इतिहास रचला आहे. ही मालिका टीम इंडियाने ५-० ने अशी जिंकली आहे. तसेच अनेक विक्रम आपले नवे केली आहेत.
* न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच भारताने टी-२० सीरीज जिंकली. तसेच टी-२० सीरीजमध्ये टीम इंडियाने लागोपाठ टी-२० सामने जिंकण्याचा रेकॉर्ड बनविला. अन्य देशात जाऊन भारतीय टीमने पहिला मालिका विजय मिळवला आहे. टीम इंडिया पाचही सामने जिंकत नवे रेकॉर्ड स्थापन केले आहेत.
* पहिल्यांदाच लागोपाठ २ सामन्यांमध्ये सुपर ओव्हर झाल्याने टीम इंडियाने या दोन्ही सुपर ओव्हरमध्ये विजय मिळविला. दोन्ही वेळा टीम इंडियाने मॅच टाय करत सुपर ओव्हरमध्ये विजय मिळविला आहे.
* टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वखाली भारताने सर्वाधिक टी-२० सीरीज जिंकण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. विराटची ही दहावी टी-२० सीरीज असून विराटने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसला मागे टाकले आहे.
* विराट कोहलीची ही तिसरी सीरीज असून ज्यामध्ये त्याने क्लीन स्वीप दिला आहे. २०१९ मध्ये वेस्टइंडीजला वेस्टइंडीज/अमेरिकेमध्ये आणि २०१६ ला ऑस्ट्रेलियाचा ३-० ने पराभव केला होता.
* पहिल्या टी-२० सामन्यात २०४ रन्सचे टार्गेट गाठत टीम इंडियाने नवा रेकॉर्ड बनविला. टी-२० मध्ये २०० हून अधिक रन्सच टार्गेट परदेशात जावून पूर्ण करण्य़ाचा रेकॉर्ड टीम इंडियाने केला. याआधी भारताने इंग्लंडमध्ये १९९ रन्सच टार्गेट गाठले होते.
वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज झालेला सामना वेलिं....
अधिक वाचा