ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

धोनीच्या भविष्याबाबत प्रशिक्षक रवी शास्त्रींचं महत्त्वाचं वक्तव्य

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 27, 2019 12:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

धोनीच्या भविष्याबाबत प्रशिक्षक रवी शास्त्रींचं महत्त्वाचं वक्तव्य

शहर : मुंबई

टीम इंडियाने बांगलादेशला टेस्ट सीरिजमध्ये -०ने मात दिली. या सीरिजची शेवटची मॅच ईडन गार्डनच्या मैदानात डे-नाईट खेळवण्यात आली. या मॅचनंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या भविष्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. काही खेळाडूंच्या आयपीएलमधल्या कामगिरीवर ठरवलं जाईल, असं शास्त्री म्हणाले.

धोनी कधी खेळायला सुरुवात करतो आणि आयपीएलमध्ये कसा खेळतो? यावर सगळं अवलंबून आहे. तसंच दुसरे खेळाडू विकेटकीपिंगमध्ये काय करत आहेत आणि धोनीशी तुलना करताना त्यांचा फॉर्म कसा आहे, हेदेखील पाहावं लागेल. आयपीएल मोठी स्पर्धा आहे कारण तुमचे जवळपास १५ खेळाडू निश्चित झाले आहेत, अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली.

आयपीएल संपल्यानंतर टीम जवळपास निश्चित होईल. कोण कुठे आहे याबाबत चर्चा करण्यापेक्षा आयपीएलपर्यंत थांबा, यानंतरच तुम्ही निर्णय घेण्याच्या मानसिकतेत असाल की सर्वोत्तम १७ खेळाडू कोण आहेत? असं वक्तव्य शास्त्रींनी केलं आहे.

रवी शास्त्रींचं हे वक्तव्य म्हणजे धोनीच्या आयपीएलमधल्या कामगिरीवर त्याचं भवितव्य अवलंबून असल्याचं बोललं जातंय. तसंच पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम निवडीसाठी आयपीएल महत्त्वाचं ठरेल, हेदेखील शास्त्रींनी स्पष्ट केलं आहे.

 

 

 

मागे

सुनील गावस्कर का भडकले?
सुनील गावस्कर का भडकले?

भारताचे महान फलंदाज, टीम इंडियाचे माजी कर्णधार, लिटल मास्टर सुनील गावस्कर न....

अधिक वाचा

पुढे  

टी-२० मालिकेसाठी शिखर धावनला डच्चू
टी-२० मालिकेसाठी शिखर धावनला डच्चू

येत्या ६ डिसेंबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणार्‍या टी-२० मालिकेसाठी....

Read more