ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पराभवानंतर ICC टेस्ट चॅम्पियनशिप यादीत भारताची मोठी घसरण, इंग्लंड अव्वल स्थानावर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 10, 2021 10:36 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पराभवानंतर ICC टेस्ट चॅम्पियनशिप यादीत भारताची मोठी घसरण, इंग्लंड अव्वल स्थानावर

शहर : मुंबई

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने शानदार कामगिरी करत यजमान भारताला 227 धावांनी पराभूत केले. या विजयासह इंग्लिश संघ कसोटी चँपियनशिप टेबलमध्ये अव्वल स्थानी गेला. या पराभवानंतर भारत चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.

चेन्नई कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघ दुसर्‍या डावात फक्त 192 धावांवर करु शकला. इंग्लंडने 420 धावांचे लक्ष्य ठेवले होते. 227 धावांनी त्यांनी सामना जिंकला. या पराभवामुळे टीम इंडियाला आता पुढच्या सामन्यांमध्ये अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.

इंग्लंड विरुद्ध मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ पहिल्या स्थानावर होता तर इंग्लंडचा संघ चौथ्या क्रमांकावर होता. आता ते उलट झाले आहे. इंग्लंडने भारताचा पराभव केल्यामुळे कसोटी स्पर्धेत विजयाची टक्केवारी 70.1 आहे. न्यूझीलंडचा संघ 70 टक्के विजयांसह दुसर्‍या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ 69 टक्के विजयांसह तिसऱ्या तर भारतीय संघ 68 टक्के विजयांसह चौथ्या स्थानावर घसरला आहे.

ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा पुढे ढकलल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाचा फायदा झाला. न्यूझीलंड कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका संपल्यानंतर अंतिम फेरीसाठी दुसरा संघ निश्चित होईल. अंतिम सामना 18 जून ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या लॉज्स येथे खेळला जाणार आहे.

मागे

ना एक धाव, ना एकही विकेट घेतली, तरीही मॅन ऑफ द मॅच, वाचा क्रिकेटमधली दुर्मिळ खेळी
ना एक धाव, ना एकही विकेट घेतली, तरीही मॅन ऑफ द मॅच, वाचा क्रिकेटमधली दुर्मिळ खेळी

क्रिकेटमध्ये (Cricket) दररोज अनेक रेकॉर्ड होतात, तसे ते ब्रेकही होतात. तशाच क्रिक....

अधिक वाचा

पुढे  

Indian Navy Recruitment 2021: क्रीडा कोट्यात विविध पदांवर भरती
Indian Navy Recruitment 2021: क्रीडा कोट्यात विविध पदांवर भरती

क्रीडापटू असणार्‍यांसाठी देशसेवेसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. भारती....

Read more