ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

टीम इंडिया न्यूझीलंड दौर्‍यासाठी रवाना

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 21, 2020 12:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

टीम इंडिया न्यूझीलंड दौर्‍यासाठी रवाना

शहर : delhi

          नवी दिल्ली : घरच्या मैदानावर श्रीलंकेचा टी-२० मालिकेत धुव्वा उडविल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ३ सामन्यांची १ दिवसीय मालिका खिशात घालून टीम इंडियाच्या विराट संघाने नव्या वर्षाची सुरुवातही चांगली केली आहे. आता परदेशातही हीच विजयी परंपरा कायम राखण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच टीम इंडिया न्यूझीलंडच्या दौर्‍यावर रवाना झाले आहे. न्यूझीलंड दौर्‍यात ५ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका टीम इंडिया खेळणार आहे. 

         टीम इंडियाचा न्यूझीलंड विरुद्ध पहिला टी-२० सामना २४ जानेवारीला दुपारी १२:३० वाजता, दुसरा सामना २६ जानेवारीला, तिसरा सामना २९ जानेवारीला तर ४ था सामना ३१ जानेवारीला आणि ५ वा सामना २ फेब्रुवारीला होणार आहे. हे सर्व सामने दुपारी १२:३० वा. सुरू होतील. तर वन डेचा पहिला सामना ५ फेब्रुवारीला दुसरा सामना ८ फेब्रुवारीला आणि तिसरा सामना ११ फेब्रुवारीला होईल. हे तिन्ही सामने सकाळी ७:३० वाजता सुरू होतील. याशिवाय १ ला कसोटी सामना २१ ते  २५ फेब्रुवारी दरम्यान  व दुसरा सामना २९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान पहाटे ४ वाजल्यापासून सुरू होईल. 

         भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बूमराह, मोहम्मद शम्मी, वॉशिंग्टन सुंदर. 

           न्यूझीलंड संघ : केन विलियम्सन (कर्णधार), हामिश बेन्नेट, टॉम ब्रूस (४-५ सामन्यांसाठी), कॉलिन डी ग्रँड होम (पहिल्या तीन सामन्यांसाठी) मार्टिन गुप्टिल, स्कॉट कुग्गेलेन, डॅरील मिचेल, कॉलीन मुन्रो, रॉस टेलर, ब्लेअर टिकनर, टीम सेईफर्ट (यष्टीरक्षक), इश सोढी व टीम साऊदी. 

मागे

सुपरमॉम सानिया मिर्झाचे पुनरागमन; दुहेरीचे अजिंक्यपद
सुपरमॉम सानिया मिर्झाचे पुनरागमन; दुहेरीचे अजिंक्यपद

       मुंबई - भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने आई झाल्यानंत....

अधिक वाचा

पुढे  

ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी 'हा' भारतीय खेळाडू पुढे सरसावला
ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी 'हा' भारतीय खेळाडू पुढे सरसावला

           नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या आगीत अनेक प्राण्या....

Read more