By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 24, 2021 10:37 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
ऑस्ट्रेलियाला चितपट केल्यानंतर भारतीय संघ पाहुण्या इंग्लंडविरोधात (Team India vs England) खेळण्यासाठी सज्ज आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात (England Tour India 2021) कसोटी मालिकेपासून होत आहे. “या कसोटी मालिकेच्या आठवडाभराआधी भारतीय खेळाडूंना क्वारंटाईन (Team India Quarntine) रहावं लागणार आहे”, अशी माहिती टीम इंडियाचे बोलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun) यांनी दिली आहे. 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. हा पहिला सामना चेन्नईमध्ये खेळण्यात येणार आहे.
भरत अरुण काय म्हणाले?
“ऑस्ट्रेलियात आम्ही धमाकेदार कामगिरी केली. आम्ही प्रत्येक विजयी क्षणाचा आनंद घेतला. पण आता हा आनंद विसरुन इंग्लंडविरोधातील मालिकेकडे लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. यासाठी इंग्लंडविरोधात खेळण्यासाठी क्वारंटाईन असताना रणनिती आखणार”, असं अरुण म्हणाले.
“इंग्लंडविरोधातील प्रत्येक सामना आपल्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत काही अंशी इंग्लंडची फलंदाजी मजबूत आहे. आपण ऑस्ट्रेलियाविरोधात त्यांच्याच भूमित खेळत होतो. कांगारुंविरोधातील पहिल्या कसोटीत भारताचा डाव 36 धावांवर आटोपला. हे विसरण्यासाठी आम्हाला 2 दिवस लागले. आम्ही फार तणावात होतो. पण हे सर्व विसरुन आणखी जोमाने तयारी केली. अशीच तयारी इंग्लंडला आव्हान देण्यासाठी करायची आहे”, असं अरुण म्हणाले.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 4 मॅचची टेस्ट सीरिज खेळण्यात येणार आहे. या सीरिजमधील पहिले 2 सामने हे चेन्नई खेळण्यात येणार आहे. या सामन्यांसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. या पहिल्या 2 सामन्यांना क्रिकेट चाहत्यांना उपस्थित राहता येणार नाही, असा निर्णय तामिळनाडू क्रिकेट बोर्डाने घेतला आहे.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी
दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी
तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी
चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च
पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.
टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कप्तान), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जैक लीच.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाने ब्रिस्बेन कसोटीत (Aus vs Ind 4th Test) विजय मिळवत इति....
अधिक वाचा