By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 07:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्रीसह माईक हेसण, टॉम मुडी, रॉबिन सिंग लालचंद राजपूत फील सिमन्स यांच्यात चुरस आहे. भारताचे महान क्रिकेटपटू कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील सल्लागार समिती लवकरच या सहाजणांची मुलाखत घेणार आहे. विश्वचषक स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतर आणि विद्यमान संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या या पदाचा करार संपुष्टात येणार आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवण्यात आले. तथापि पुन्हा रवी शास्त्री यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान टीम इंडियाच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सहाय्यक प्रशिक्षक पदांसाठी बीबीसीआयकडे तब्बल दोन हजार अर्ज आले होते. या पदांवर निवडीचा निर्णय एम एस के प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती घेईल मुख्य प्रशिक्षक पदासाठी ही रवी शास्त्री यांची मुलाखत स्काईप द्वारे घेण्यात येणार आहे. कर्णधारपद विराट कोहलीची रवी शास्त्रीनाच पसंती असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे.
टोकियो येथे पुढच्या वर्षी म्हणजेच 24 जुलै ते 9 ऑगस्ट 2020 दरम्यान ऑलिम्पिक स्पर्....
अधिक वाचा