By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 02:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या विराट कोहली आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत या आणि संघातील इतरही खेळाडूंच्या बळावर भारतीय क्रिकेट संघाने तिसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाचा पराभव केला. ७ गडी राखत भारतीय खेळाडूंनी हा सामना खिशात टाकला.
कोहली आणि पंतच्यी तिसऱ्या विकेटसाठीची १०६ धावांची भागीदारी या सामन्यातील प्रशंसनीय बाब ठरली. कोहलीने या सामन्यात त्याच्या टी20 कारकिर्दीतील एकवीसावं अर्धशतक झळकावलं. ज्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात टी20 सामन्यांमध्ये सर्वाधिक अर्धशतचं ठोकणाऱ्या रोहित शर्माची बरोबरी साधली आहे.
के.एल. राहुलच्या साथीने मैदानात आलेल्या शिखर धवनला अंतिम सामन्यात विशेष कामगिरी करता आली नाही. तो अवघ्या ३ धावांवर त्रिफळाचीत झाला. ओश्ने थॉमसने त्याची विकेट घेतली. त्याच्यामागोमागच राहुलही २० धावा करत तंबूत परतला. सलामीवीर परतल्यानंतर कर्णधारपदाला साजेशी खेळी करत विराट आणि त्याला साथ देत ऋषभ पंतने संघाला विजयी सीमेवर नेऊन ठेवलं. कोहलीने या सामन्यात ४५ चेंडूत ५९ तर, पंतने ४२ चेंडूत ६५ धावा केल्या.
विराट कोहलीने नाणेफेक जिंकत या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय संघाची चांगलाच फळतानाही दिसला. विंडिजकडून फक्त पोलार्डचीच एकाकी झुंज पाहायला मिळाली. पण, त्याची खेळीही संघाचा पराजय टाळू शकली नाही. डाव काहीसा सावरत आहे, असं दिसतानात भारतीय गोलंदाजांनी विंडिजवर आक्रमक मारा केला आणि पुढे फलंदाजांनी संयमी खेळी करत सामना जिंकला. संघाच्या या यशाबद्दल विराट कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोटो पोस्ट करत आनंदही व्यक्त केला आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्....
अधिक वाचा