By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 11, 2019 04:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं 601 धावांवर डाव घोषित केला. यात विराटनं सर्वोश्रेष्ठ अशी 254 धावांची कामगिरी केली आहे. विराटच्या द्विशतकासह भारतानं आफ्रिकेसमोर तब्बल 601 धावांचा डोंगर उभा केला आहे. पहिल्या दिवशी भारतानं 273 धावा केल्या. तर, दुसऱ्या दिवशी विराट आणि रहाणे यांच्या शतकी भागिदारीनं भारताचा डाव पुढे सरकरला. विराटनं 10 महिन्यांनंतर शतकी कामगिरी केली तर, रहाणे 58 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराटनं जडेजासोबत विक्रमी अशी 225 धावांची भागिदारी केली. जडेजा 91 धावांवर बाद झाला, त्याला आपले शतक पूर्ण करता आले नाही.
Innings Break!#TeamIndia declare their innings after putting a formidable total of 601/5 on the board.#INDvSA pic.twitter.com/sFjqtQMQPO
— BCCI (@BCCI) October 11, 2019
तत्पूर्वी, भारतानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताला 10व्या ओव्हरमध्येच पहिला झटका बसला. रोहित शर्मा फक्त 14 धावा करत बाद झाला. त्यानंतर पुजारा आणि मयंकनं शतकी भागिदारी केली. मात्र पुजारा अर्धशतकी खेळी करत बाद झाला. मयंकनं या सामन्यातही आक्रमक आणि संयमी खेळीचे योग्य प्रदर्शन केले. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा मयंक अग्रवालनं शानदार खेळी केली. सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या मयंकनं या सामन्यातही शतकी खेळी केली. 184 चेंडूत मयंकनं 16 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 104 धावा केल्या. त्यामुळं मयंक आणि विराट यांच्या शतकांमुळं भारताला मोठी धावसंख्या उभारता आली आहे.
भारताची कर्णधार मिताली राजने इतिहास घडवला आहे. २० वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिक....
अधिक वाचा