ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेणाऱ्या चारुलता पटेल यांचं निधन

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 16, 2020 01:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेणाऱ्या चारुलता पटेल यांचं निधन

शहर : देश

       नवी दिल्ली - इंग्लंडमध्ये २०१९ साली पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला बाहेर पडावे लागले. मात्र भारतीय चाहते आपल्या संघाला भरभरून पाठींबा देत आवर्जून ताठ उभे होते. त्यातच भारतीय संघाच्या सुपरफॅन चारुलता पटेल यांचाही समावेश होता. या आजीचं १३ जानेवारीला सायंकाळी निधन झाल्याची माहिती त्यांच्या नातीनं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली. चारुलता यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

 


       वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्धचा सामना पाहण्यासाठी त्या स्टेडियमवर आल्या होत्या. त्यावेळी कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मासह अन्य खेळाडूंनीही त्यांची भेट घेतली होती. विराटने विश्वचषक जिंकावा अशी त्यांची प्रबळ इच्छा होती. तिरंगा स्कार्फसह पिपाणी वाजवणा-या आजीनं सर्वांचच लक्ष वेधून घेतलं होतं. 

 


       दरम्यान, चारुलता यांनी भारताच्या संपूर्ण संघाला आशीर्वाद दिले होते. त्यावेळी विराटने चारुलता यांना "पुढच्या सामन्यांमध्येही आम्ही तुम्हाला प्रेक्षक गॅलरीत पाहू इच्छितो", अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर चारुलता यांनी "माझ्याकडे तिकीट नाही, मी पुढच्या सामन्यांसाठी येऊ शकणार नाही", असं सांगितलं. त्यावर कोहलीने त्यांची अडचण समजून घेतली. "मी तुम्हाला पुढची सर्व तिकीट देईन", असा शब्द दिला याशिवाय महिंद्र समूहाचे चेअरमन आनंद मेहता यांनीही त्यांना तिकीटाची ऑफर दिली होती. त्यावेळी ६ जुलै २०१९ रोजीला होणारा श्रीलंकेविरुद्ध सामना तसेच दोन्ही सेमीफायनल आणि फायनलचं तिकीट देत कोहलीने दिलेले आश्वासन पूर्ण केलं होतं.    
 

मागे

मॅनचेस्टर युनायटेडने एफए कपच्या रिप्लेमध्ये लांडगेला पराभूत केले कारण राशफोर्डला दुखापत झाली आहे
मॅनचेस्टर युनायटेडने एफए कपच्या रिप्लेमध्ये लांडगेला पराभूत केले कारण राशफोर्डला दुखापत झाली आहे

जुआन मटाने बुधवारी ओल्ड ट्रॅफर्ड येथे केलेल्या रिप्लेमध्ये वॉल्व्हरहॅम्प....

अधिक वाचा

पुढे  

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार नाही 
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार नाही 

   नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वातावरण तापलेले असताना पा....

Read more