ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ठाणे सेंटर संघाने उडवला ऑस्ट्रेलियन संघाचा धुव्वा

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 16, 2019 02:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ठाणे सेंटर संघाने उडवला ऑस्ट्रेलियन संघाचा धुव्वा

शहर : ठाणे

आज प्रथमच ठाणे विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाचा सामना रंगला. 16 वर्षांखालील गटात झालेल्या क्रिकेटच्या सामन्यात ठाणे सेंटर संघाने 3 गडी राखून ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. ठाणेकर क्रिकेटप्रेमींनी हा सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र दोन्ही संघांच्या फटकेबाजीने उपस्थितांची मने जिंकली. ठाण्यातील ठाणे सेंटर संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा 35 षटकांचा सराव सामना दादोजी कोंडदेव येथे झाला. ठाण्याच्या संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. दादोजी कोंडदेव येथील धावपट्टी ही उत्तम दर्जाची असून याची माहिती ऑस्ट्रेलियात देणार असल्याचे ऑस्ट्रेलिया 16 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक ब्रूस कूड यांनी आवर्जून नमूद केले. याकेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एकदिवसीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांनी दिली.

मागे

जडेजाची वर्ल्ड कप संघात निवड,  या निवडीमागे भाजपा कनेक्शन ?
जडेजाची वर्ल्ड कप संघात निवड, या निवडीमागे भाजपा कनेक्शन ?

आयसीसी 2019 : बीसीसीआयने सोमवारी दुपारी 3.15 च्या सुमारास वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच....

अधिक वाचा

पुढे  

वर्ल्ड कप निवडीनंतर दिनेश कार्तिकची प्रतिक्रिया
वर्ल्ड कप निवडीनंतर दिनेश कार्तिकची प्रतिक्रिया

वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची १५ एप्रिलला घोषणा झाली. त्यामध्ये जवळजवळ काही ख....

Read more