By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2019 06:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बांगलादेशला कसोटी आणि टी-20मध्ये चारीमुंड्या चीत केल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे. 6 डिसेंबरपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. यातील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आता. मात्र आता सुरक्षेच्या कारणास्तव हा सामना दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत-वेस्ट इंडिज यांच्यात पहिला टी-20 सामना 6 डिसेंबरला होणार आहे. याआधी मुंबई पोलिसांनी सुरक्षा देता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. तसे पत्र मुंबई क्रिकेट असोसिएशनला पाठवण्यात आले होते. 6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यासाठी आपण सुरक्षा देऊ शकत नाही, असं पोलिसांचं म्हणणं होते. दरम्यान याच मुद्यावरून बीसीसीआयनं हा सामना हैदराबादला हलवण्याचा निर्णय घेतला असावा. त्यामुळं आता हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होणार आहे.
तसेच, अयोध्येतल्या रामजन्मभूमीच्या वादग्रस्त जागेबद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. अयोध्येत राम मंदिर उभारण्याला सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदिल दिला आहे. 6 डिसेंबर 1992 ला अयोध्येत बाबरी मशीद पाडल्याची घटना घडली होती. अयोध्येतल्या रामजन्मभूमी प्रकरणी निकाल आल्यानंतरचा हा पहिलाच 6 डिसेंबर आहे. हा संवेदनशील दिवस असल्याने देशभरात कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतही कडेकोट पोलीस बंदोबस्त असेल.
असा आहे भारत-वेस्ट इंडिज दौरा
6 डिसेंबर 2019 - पहिला T20I, हैदराबाद
8 डिसेंबर 2019 - दुसरा T20I, तिरुवनंतपुरम
11 डिसेंबर 2019 - तिसरा T20I, हैदराबाद
T20I मालिकेसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.
खेळ मग तो कोणताही असो काही मोजक्या खेळाडूंना त्यांच्या नावा आधी ब्रँड असा श....
अधिक वाचा