ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी गुरु राहुल द्रविडचा खास मंत्र, मोठ्या विजयानंतर अजिंक्य रहाणेने गुपित सांगितलं

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 31, 2021 09:03 AM 2019-02-12T14:15:30+5:30

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी गुरु राहुल द्रविडचा खास मंत्र, मोठ्या विजयानंतर अजिंक्य रहाणेने गुपित सांगितलं

शहर : मुंबई

“आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020o) मोसमानंतर आम्ही दुबईहून थेट ऑस्ट्रेलियाच्या दिशेने निघत होतो. तेव्हा राहुल द्रविडने (Rahul Dravid) मला कॉल केला होता. ताण घेण्याची गरज नाही, पहिल्या कसोटीनंतर तुलाच टीम इंडियाचे नेतृत्व करायचं आहे. तु फार चांगली फलंदाजी करतोय. फक्त फार वेळ नेट्स मध्ये सराव करु नकोस. जी चूक मी केली, त्या चुकीची पुनरावृत्ती तु करु नकोस. बाकी कोणत्याही गोष्टीचा दबाव घेऊ नको. चांगल्या प्रकारे टीम इंडियाचे नेतृत्व कर. खेळाडूंना विश्वासात घे. मालिकेच्या निकालाबाबत फार विचार करु नकोस. निकाल आपोआप येईल, असा सल्ला टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने (Rahul Dravid)  दिला असल्याचं अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) सांगितलं. रहाणे समालोचक हर्षा भोगलेच्या (Harsha Bhogale) एका विशेष कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळेस रहाणे बोलत होता.

ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली पाल्कत्वाच्या रजेमुळे भारतात परतला. यामुळे कसोटी मालिकेतील नेतृत्वाची जबाबदारी रहाणेला मिळाली. पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून निराशाजनक पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे 4 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 0-1 पिछाडीवर पडली होती. तसेच मुख्य खेळाडू हे दुखापतग्रस्त झाले होते. यानंतर रहाणेने आपल्या नेतृत्वात नवख्या खेळाडूंना सोबत घेत जोरदार पुनरागमन करत दुसरा सामना जिंकला. यासह मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. तिसरा सामना बरोबरीत राखण्यास दोन्ही संघांना यश आले. तर चौथ्या आणि शेवटच्या रोमांचक झालेल्या सामन्यात टीम इंडियाने कांगारुंचा 3 विकेट्सने पराभव केला.

कांगारुंचा ब्रिस्बेनवर तब्बल 32 वर्षानंतर पराभव झाला होता. अनेक खेळाडू दुखापतग्रस्त होते. नवख्या खेळाडूंना सोबत घेत रहाणेने भारताला कसोटी मालिकेत विजय मिळवून दिला. यामुळे कर्णधार रहाणेला क्रिकेटविश्वातून कौतुक करण्यात आलं. विराटऐवजी रहाणेलाच कर्णधार करा, अशी मागणी करण्यात आली. रहाणेचं भारतात परतल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आलं.

इंग्लंडचा भारत दौरा

दरम्यान ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतात दाखल झाला आहे. 5 फेब्रुवारीपासून 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यासाठी दोन्ही संघ चेन्नईमध्ये क्वारंटाईन झाले आहेत.

मागे

30 शतकं आणि 11 हजारांपेक्षा अधिक धावा,पहिल्याच सामन्यात द्विशतक,तरीही टीम इंडियात निवड न होताच निवृत
30 शतकं आणि 11 हजारांपेक्षा अधिक धावा,पहिल्याच सामन्यात द्विशतक,तरीही टीम इंडियात निवड न होताच निवृत

क्रिकेट विश्वात (Cricket) दररोज अनेक खेळाडू क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पाहतात. त....

अधिक वाचा

पुढे  

भारत-इंग्लंड टेस्ट सामन्याआधी बीसीसीआयची क्रिकेट चाहत्यांना मोठी खूशखबर
भारत-इंग्लंड टेस्ट सामन्याआधी बीसीसीआयची क्रिकेट चाहत्यांना मोठी खूशखबर

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या चार सामन्यांच्या कसोटी मालिक....

Read more