By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 06:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : chennai
धोनीच्या संघाने मंगळवारी घरच्या मैदानावर कोलकाता नाइट रायडर्सवर 7 विकेटने विजय मिळवला. मात्र, विजयाचे सेलिब्रेशन करण्याएवढा वेळ त्यांच्याकडे नव्हता. कारण पुढच्या सामन्यासाठी संघाला जयपूरला जायचे होते. या दरम्यान विमानतळावरील फोटो धोनीने सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत धोनी आणि त्याची पत्नी विमानतळावर बॅग डोक्याखाली घेऊन फरशीवरच झोपलेले दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना धोनीने म्हटले आहे की, आयपीएलच्या वेळेची सवय झाल्यानंतर आणि सकाळी लवकर विमान असले की असेच होते.
सलग आणि विविध ठिकाणी असणारे सामने यामुळे खेळाडू प्रवासाने थकून जातात. या धावपळीमुळे पुरेशी झोप मिळत नाही. याचा परिणाम खेळावर होऊ शकतो. कदाचित याच कारणास्तव धोनी आणि त्याची पत्नी साक्षीने विमानतळाच्या फरशीवरच झोपण्याचा निर्णय घेतला असणार. धोनीच्या याच साधेपणाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
काल चेन्नई येथे झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने केेकेआरचा दारूण ....
अधिक वाचा