By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 06:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या एस.श्रीशांतवर भारतीय संघाचे माजी सहायक प्रशिक्षक पॅडी अपटन यांनी आपल्या आत्मचरित्रात गंभीर आरोप केले आहेत. अपटन यांनी आपल्या इरीशषेेीं उेरलह या पुस्तकात एक धक्कादायक प्रसंग विशद केला आहे. यात त्यांनी श्रीशांतनं माजी क्रिकेटपटू आणि भारतीय युवा संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड यालाच शिव्या घातल्या, असा आरोप केला आहे. 2013 साली स्पॉट फिक्सींग प्रकरणी राजस्थान रॉयल्स संघाचे खेळाडू श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंदेला यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अपटन यांनी आपल्या पुस्तकात केलेल्या दाव्यानुसार या खेळाडूंना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची संघातून लगेचच हकालपट्टी करण्यात आली होती. यातच श्रीशांतचा स्वभाव विक्षिप्त असल्यामुळं प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान श्रीशांतनं राहुलला शिवीगाळ केली होती, असा आरोप अपटन यांनी केला आहे. दरम्यान श्रीशांतनं हे आरोप फेटाळून लावले आहेत.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना श्रीशांतनं, ”अपटन खोटारडा असून मी कधीच द्रविडला शिवीगाळ केली नाही. मी नेहमीच माझ्या सहकार्यांचा आधार केला आहे”.
अपटन यांनी आपल्या पुस्तकात श्रीशांत आणि 2013 साली झालेल्या स्पॉट फिक्सिंग या प्रकरणी भाष्य केलं आहे. अपटननं आपल्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, मुंबईविरुद्ध झालेल्या सामन्यात श्रीशांत आणि चंदेला या दोन्ही खेळाडूंना संघाबाहेर बसवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी अंकितची फिक्सिंगकरिता निवड केली. दिल्ली पोलिसांनी आपल्या 6 हजार पानांच्या चार्जशीटमध्ये चंदेला अंकित फिक्सिंग कशी करावी, याबाबत माहिती देत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय टी-20 आयसीसी रँकिंगमध्ये एक पायरी खाली घसर....
अधिक वाचा