By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 16, 2019 11:12 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : chennai
भारताचे माजी क्रिकेटपट्टू व्ही. बी. चन्द्रशेखर यांचे चेन्नईत हृदयविकरच्या झटक्याने निधन झाले. ते 57 वर्षाचे होते. आक्रमक गोलंदाजीसाठी ते ओळखले जात. क्रिकेट वर्तुळात ते व्ही. बी. म्हणून प्रसिद्ध होते.
भारतीय संघाकडून ते 7 एकदिवसीय सामने खेळले. मात्र प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये चन्द्रशेखर यांचा मोठा दबदबा होता. 1988 मध्ये इराणी चषकात तामिळनाडूकडून खेळताना 56 चेंडूत त्यांनी 100 धावांची विक्रमी खेळी केली होती. भारतातील क्रिकेट मधील हे सर्वात वेगवान शतक ठरले होते. आय पी एल मध्ये त्यांनी चेन्नई सुपर किंग साठी व्यवस्थापकाची भूमिका निभावली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती घेतल्यानंतर निवड समिती सदस्य, प्रशिक्षक आणि समालोचक अशी विविध माध्यमातून त्यांनी आपली नाळ क्रिकेटसोबत जोडून ठेवली होती.
वेस्ट इंडिज विरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना भारतीय संघाने सहा गडी आणि पंधरा....
अधिक वाचा