ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2020: Vi कंपनी बनली को-स्पॉन्सर, मिळाले लाईव्ह ब्रॉडकास्ट स्पॉन्सरशिप राइट्स

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2020 12:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2020: Vi कंपनी बनली को-स्पॉन्सर, मिळाले लाईव्ह ब्रॉडकास्ट स्पॉन्सरशिप राइट्स

शहर : मुंबई

 टेलीकॉम ऑपरेटर कंपनी वोडाफोन-आइडिया (Vi) Dream11 IPL 2020 ची को-स्पॉन्सर बनली आहे. IPL 2020 ची सुरुवात १९ सप्टेंबरपासून यूएई (UAE)येथे होणार आहे. ही माहिती कंपनीने शनिवारी एका प्रेस रिलीज द्वारे दिली आहे.

वोडाफोन आणि आयडिया या कंपनीचा IPL क्रिकेट टूर्नामेंटमध्ये याआधीही काहीना काही सहभाग राहिला आहे. ऑगस्ट 2018 मध्ये पहिल्यांदा वोडाफोन आयडिया कंपनी एकत्र आल्यानंतर स्पॉन्सरशिप डील साईन केली आहे. ही कंपनी आता 'Vi' ब्रांड खाली ऑपरेट होत आहे.

Vi ला T-20 प्रीमियर लीगच्या लाईव्ह ब्रॉडकास्टची को-स्पॉन्सरशिप राइट्स देखील मिळाल्या आहेत.  Dream-11 IPL 2020 चं आयोजन यूएईमध्ये होत असून याचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.

Dream11 ने 222 कोटी रुपयांमध्ये IPL 2020 ची स्पॉन्सरशिप मिळवली होती. याआधी भारत आणि चीन यांच्यातील तणावामुळे विवोला स्पॉन्सरशिप देण्यास विरोध होत होता. त्यामुळे बीसीसीआयने यंदा ड्रिम ११ या कंपनीला आयपीएलचं टायटल स्पॉन्सरशिप दिले आहे.सध्या Vi ने स्टार स्पोर्ट्ससह को-स्पॉन्सर डीलबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मागील आठवड्यात सोमवारी वोडाफोन-आयडियाने भारतात आपली नवी ओळख जाहीर केली होती. Vi कंपनीचे भारतात जवळपास 280 मिलियन सब्सक्राइबर्स आहेत.

 

मागे

आज ‘IPL’च्या वेळापत्रकाची घोषणा
आज ‘IPL’च्या वेळापत्रकाची घोषणा

आयपीएल २०२० (IPL 2020)या स्पर्धेचं वेळापत्रक शुक्रवारी जाहीर होईल, अशी माहिती स....

अधिक वाचा

पुढे  

सचिन तेंडुलकर पेटीएम फर्स्ट गेम्सचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर, छोट्या व्यापाऱ्यांचा विरोध
सचिन तेंडुलकर पेटीएम फर्स्ट गेम्सचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर, छोट्या व्यापाऱ्यांचा विरोध

पेटीएमची सहयोगी कंपनी पेटीएम फर्स्ट गेम्सने (पीएफजी) मास्टरब्लास्टर सचिन त....

Read more